भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच लवकरच पुनरागमन होणार आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर दुखापतीमुळे मोहम्मद शमी संघाबाहेर होता. मात्र, तो आता पूर्णपणे बारा झाला असून, लवकरच संघासोबत जुळणार आहे. (mohammed shami comeback in Indian team against bangladesh)
विनेश फोगाट निश्चितपणे रौप्य पदक जिंकण्यास पात्र: सचिन तेंडुलकर
बांगलादेशविरुद्ध 19 सप्टेंबरपासून चेन्नई येथे सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेसाठी शमी संघात पुनरागमन करू शकतो. (mohammed shami comeback in Indian team against bangladesh)
शमी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अवघ्या सात सामन्यांमध्ये 24 बळी घेणारा आघाडीचा गोलंदाज होता. विश्वचषकानंतर उजव्या टाचेच्या दुखापतीमुळे शमीला क्रिकेटपासून दूर राहावे लागले. यामुळे 2024 साली त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. तो अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. (mohammed shami comeback in Indian team against bangladesh)
विनेश फोगाटला संयुक्त रौप्य पदकासाठी पाहावी लागणार वाट, पॅरिस ऑलिम्पिकच्या शेवटी येईल निर्णय
शमी दुखापतीतून बरा झाला आहे. एका अहवालानुसार, शमी सध्या एनसीएमध्ये त्याच्या पुनर्वसनाच्या अंतिम टप्प्यात आहे आणि गेल्या महिन्यात त्याने गोलंदाजी सुरू केली आहे. तंदुरुस्त झाल्यानंतर शमीने हळूहळू त्याच्या गोलंदाजीवर कामाचा ताण वाढवला असल्याचे अहवालात म्हटले आहे. (mohammed shami comeback in Indian team against bangladesh)
या महिन्याच्या सुरुवातीला, श्रीलंकेच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पत्रकार परिषदेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले होते की शमीने गोलंदाजी सुरू केली होती. 19 सप्टेंबरपासून चेन्नई येथे सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्ध भारताच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून तो आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करू शकेल. (mohammed shami comeback in Indian team against bangladesh)