28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeक्रीडापेलेच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली; म्हणाले त्यांची कारकीर्द भावी पिढ्यांना ते प्रेरणा...

पेलेच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली; म्हणाले त्यांची कारकीर्द भावी पिढ्यांना ते प्रेरणा देईल

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. साओ पाऊलो येथील अल्बर्ट आईन्सटाईन हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार कोलन कॅन्सरमुळे गुरुवारी पेले यांचे निधन झाले. गेल्या महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पेले यांच्यानिधनानंतर जगभरातून त्यांचे चाहते शोक व्यक्त करत आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्यानिधनानंतर शोक व्यक्त केला (Narendra Modi Tribute After Pele Death) असून ते म्हणाले, पेले यांच्या निधनाने क्रीडा जगतात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कारकिर्द आणि यश येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

पेले हे आपल्या कारकिर्दीत ब्राझीलसाठी चार फुटबॉल विश्वचशक खेळले आणि तीन वेळा ते चॅम्पियन ठरले. पेले एका मुलाखतीत म्हणाले होते की, मी फुटबॉलसाठीच जन्माला आलो होतो. जसे वीथोवेन संगीत आणि मायकल ऐंजोलो पेंटीगसाठीच जन्माला आले होते.

पेले यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९४० साली मिनास गेराईस येथे झाला होता. सुरूवातीचे आयुष्य त्यांना गरीबीत काढावे लागले. ते चहाच्या दुकानावर काम करायचे. स्थानिक फुटबॉल क्लबमध्ये गोलकिपर बिले यांचे मोठे नाव होते त्यांच्या नावावरून पेले नाव त्यांना मिळाले. त्याआधी त्यांना डिको या नावाने ओळखले जात असे.
पेले यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, माझे वडील डोनडिन्हो हे एक चांगले फुटबॉलपटू होते. मला त्यांच्यासारखे व्हायचे होते. ते माझे आदर्श होते. मी त्यांच्यासारखा झालो की नाही हे आज देवच सांगू शकतो.

हे सुद्धा वाचा

ऋषभ पंतला पेंग आल्यामुळे झाला अपघात; दोनशे मीटर पर्यंत गाडीने घेतल्या पलट्या..

हिराबेन मोदी यांचे निधन; शोकमग्न पंतप्रधानांनी म्हटले, एक गौरवशाली शतक ईश्वरचरणी विसावले !

‘गेल्या चार महिन्यांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या’

पेले यांच्या निधनानंतर जगभरातील अनेक दिग्गज खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे. पोर्तुगालचा फुटबॉल पटू क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी म्हटले आहे की, किंग पेले यांच्या निधनाचे दु:ख शब्दात सांगू शकत नाही. माझ्याबद्द्ल त्यांना अपार स्नेह होता. प्रत्येक फुटबॉलप्रेमीला त्यांची आठवण येत राहील. तुम्हाला चिरशांती लाभो किंग पेले. ब्राझीलचा फुटबॉलपटू रॉवर्टो रिवेलिन्हो यांनी म्हटले आहे की, आता तुम्ही देवाच्या सानिध्यात आहात… राजा चिरशांती लाभो.. तर ब्राझीलचा प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमार याने म्हटले आहे की, पेलेच्या आधी जर्सीचा १० नंबर हा केवळ एक नंबर होता. असे मी कुठेतरी वाचले होते. मात्र ही एक अत्यत सुंदर आणि अर्धवट ओळ आहे. मी म्हणेण की, फुटबॉल केवळ एक खेळ होता. पेलेने सगळेच बदलून टाकले. त्याने फुटबॉलला खेळ आणि मनोरंजन बनविले. त्याने गरीब आणि कृष्णवर्णीयांना आवाज मिळवून दिला आणि ब्राझीलला ओळख मिळवून दिली. पेले आता आपल्यात राहीले नाहीत पण त्यांची जादू कायम राहील. पेले अमर आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी