25 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरक्रीडाऑस्ट्रेलियाचा 'लायन' अश्विनपेक्षा भारी

ऑस्ट्रेलियाचा ‘लायन’ अश्विनपेक्षा भारी

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज नॅथन लायनने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करत एक मोठा विक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विन यांना मागे टाकत लिऑन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा आठवा गोलंदाज ठरला आहे.

आजकाल क्रिकेटमध्ये अनेक नवनविन विक्रम रचले जातात आणि अनेक जुने विक्रम मोडीत निघत असतात. अशा वेळी नवे विक्रम रचणाऱ्या खेळाडूची सर्वत्रचर्चा व्हायला सुरुवात होते. सध्या अशाच एका ऑस्ट्रेलिन खेळाडूची चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज नॅथन लायनने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करत एक मोठा विक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विन यांना मागे टाकत लायन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा आठवा गोलंदाज ठरला आहे.

नॅथनने अश्विनला मागे टाकले
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीच्या दुसऱ्या डावात काइल मेयरला बाद करताच ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने अश्विनला मागे टाकले. आता त्याच्या नावावर 446 कसोटी विकेट्स झाल्या आहेत. त्याचबरोबर अश्विनच्या नावावर 442 कसोटी विकेट आहेत. या विशेष विक्रमासह नॅथन लायन आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा आठवा गोलंदाज बनला आहे.

हे सुद्धा वाचा

प्रियकरासाठी पतीची स्लो पॉयझन देऊन हत्या, मुंबई पोलिसांकडून प्रकार उघडकीस

‘हर हर महादेव’ चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास… संभाजीराजे आक्रमक

दोन जुळ्या बहिनींचा एकाच मुलाशी विवाह, आगळ्या-वेगळ्या नात्याची सर्वत्र चर्चा

नॅथन लायनने आपल्या 111व्या कसोटी सामन्यात ही विशेष कामगिरी केली आहे. दुसरीकडे, अश्विनने भारतासाठी आतापर्यंत 86 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 442 फलंदाजांची शिकार केली आहे. नॅथन लायन सध्या ऑस्ट्रेलियन संघातील सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. त्याने अनेक प्रसंगी ऑस्ट्रेलियन संघासाठी मॅचविनर्स गोलंदाजी केली आहे.

अश्विन पुन्हा लायनला मागे सोडू शकतो
मात्र, भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनकडे अजूनही नॅथन लायनला मागे सोडण्याची चांगली संधी आहे. खरेतर, बांगलादेशविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत अश्विनने चमकदार गोलंदाजी केल्यास तो नॅथन लायनला मागे टाकेल आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा आठवा गोलंदाज बनेल.

कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) – 80
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) – 708
जेम्स अँडरसन (इंग्लंड) – 668
अनिल कुंबळे (भारत) – 619
स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) – 566
ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) – 563
कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) – 519
नॅथन लायन (ऑस्ट्रेलिया) – 446
आर अश्विन (भारत) – 442
डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका) – 439

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!