26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeक्रीडाNeeraj Chopra : नीरज चोप्राचा 'भाला' सुसाट, आतापर्यंत कमावले 'इतके' पदक

Neeraj Chopra : नीरज चोप्राचा ‘भाला’ सुसाट, आतापर्यंत कमावले ‘इतके’ पदक

खेळाडू नीरज चोप्रा याची पदक कमाईची घौडदौड चांगलीच सुरू आहे. देशाची मान पुन्हा पुन्हा गौरवाने उंचावेल अशा पद्धतीने तो चाल करीत दरवेळी वेगळे विक्रम तो रचत आहे. या स्पर्धेआधी सुद्धा अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत अनेक पदकांची त्याने लयलूट केली आहे. भारताचे प्रतिनिधित्व करताना नीरजने कनिष्ठ आणि वरिष्ठ स्तरावर आतापर्यंत 19 पदके जिंकली आहेत, ज्यात 12 सुवर्णपदकांचा समावेश आहे.

टोकिओ ऑलिंम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून आणल्यानंतर भारतीय खेळाडू नीरज चोप्रा चांगलाच नावारुपास आला. त्याच्यातील प्रचंड जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम घेण्याची तयारी या साऱ्याच गोष्टींमुळे नीरज लवकरच सगळ्यांचा लाडका खेळाडू बनला आणि सगळ्यांच्याच त्याच्याकडून आकांक्षा वाढल्या. जेव्हा जेव्हा नीरज चोप्रा खेळासाठी मैदानात उतरतो तेव्हा तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वासच बरंच काही सांगून जातो. दरम्यान नीरज चोप्राने पुन्हा एकदा भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. डायमंड लीगच्या अंतिम फेरीमध्ये नीरजने डायमंड ट्राॅफी पटकावली असून ही ट्राॅफी पटकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

झुरिच येथे डायमंड लीगच्या स्पर्धेत नीरज चोप्राने अतुलनीय अशी कामगिरी केली आहे. डायमंड लीगच्या अंतिम फेरीत 88.44 मी. भालाफेक करत नीरजने विजयाला गवसणी घातली आहे. डायमंड लीगची ट्राॅफी जिंकल्याने नीरजचे सर्वदूर कौतुक करण्यात येत आहे. गोल्डन बाॅय म्हणून ओळख असणाऱ्या नीरज चोप्राने त्यांचे डायमंड लीग ट्राॅफी जिकण्याचे स्वप्न यावेळी पुर्ण केले आहे. डायमंड लीगची ट्राॅफी जिंकणारा नीरज चोप्रा हा यानिमित्ताने पहिला भारतीय ठरला आहे.

डायमंड लीगमधील खेळाच्या अंतिम फेरीत नीरजची खराब सुरवात झाली होती, पहिला प्रयत्न फाऊल झाला परंतु दुसऱ्या प्रयत्नात नीरजने उसळी मारली यावेळी त्याने 88.44 मीटर अंतरावर भालाफेक करत प्रतिस्पर्धीला गार केले. त्यानंतर हाच आवेश कायम ठेवत तिसऱ्या प्रयत्नात 88.00 मीटर, चौथ्या प्रयत्नात 86.11 मीटर, पाचव्या प्रयत्नात 87.00 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 83.60 मीटर पर्यंत भाला त्याने फेकला आणि भारताची विजयी पताकाच बांधली.

Neeraj Chopra : नीरज चोप्राचा 'भाला' सुसाट, आतापर्यंत कमावले 'इतके' पदक

हे सुद्धा वाचा…

Virat Kohli : अजूनही माझ्यात‍ क्रिकेट बाकी; ७१ वे शतक झळकल्यानंतर‍ विराट कोहलीचं वक्तव्य

राणी एलिझाबेथ यांच्या निधनामुळे राष्ट्रगीत बदलणार, चलन बदलणार, अन् सैन्यदलातील बोधचिन्ह बदलणार

Queen Elizabeth II : महाराणी एलिझाबेथ यांच्या पार्थ‍िवावर 10 दिवसांनी होणार अंत्यसंस्कार

खेळाडू नीरज चोप्रा याची पदक कमाईची घौडदौड चांगलीच सुरू आहे. देशाची मान पुन्हा पुन्हा गौरवाने उंचावेल अशा पद्धतीने तो चाल करीत दरवेळी वेगळे विक्रम तो रचत आहे. या स्पर्धेआधी सुद्धा अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत अनेक पदकांची त्याने लयलूट केली आहे. भारताचे प्रतिनिधित्व करताना नीरजने कनिष्ठ आणि वरिष्ठ स्तरावर आतापर्यंत 19 पदके जिंकली आहेत, ज्यात 12 सुवर्णपदकांचा समावेश आहे. दरम्यान, नीरज चोप्राने 2021 मध्ये टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, त्याआधी 2018 मध्ये आशियाई स्पर्धत सुवर्णपदक नीरजने पटकावले होते, 2018 मध्येच म्हणजे त्याच वर्षी राष्ट्रकुलमध्ये सुद्धा सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यानंतर यंदाच्या 2022 या वर्षी ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळवले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी