30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeक्रीडाNZ vs IND : कर्णधार हार्दीकचा दबदबा कायम! न्यूझीलंडला धूळ चारत जिंकला...

NZ vs IND : कर्णधार हार्दीकचा दबदबा कायम! न्यूझीलंडला धूळ चारत जिंकला टी-20 सामना

भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. सूर्यकुमार यादवच्या शानदार शतकी खेळीनंतर युझवेंद्र चहलच्या चतुरस्त्र खेळीने यजमानांना खिंडार पाडले.

भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. सूर्यकुमार यादवच्या शानदार शतकी खेळीनंतर युझवेंद्र चहलच्या चतुरस्त्र खेळीने यजमानांना खिंडार पाडले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 6 बाद 191 धावा केल्या. सूर्यकुमारने टी-20 मध्ये दुसऱ्यांदा शतक झळकावले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 18.5 षटकांत केवळ 126 धावाच करू शकला. भारताने 65 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

तत्पूर्वी, न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावाची सुरुवात करताना ऋषभ पंतने (06 धावा) पुन्हा एकदा निराशा केली, पण त्यानंतर इशान किशन आणि सूर्य कुमार यादव यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. इशान किशनने 31 चेंडूत 36 धावांची खेळी केली. याशिवाय सूर्य कुमार यादव वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मधल्या फळीत मोठी खेळी करता आली नाही. सूर्य कुमार यादवने एकट्याने आघाडी घेतली आणि तुफानी फलंदाजी करताना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरे शतक झळकावले. सूर्य कुमार यादवने 51 चेंडूत 111 धावांची खेळी केली. सूर्य कुमार यादवने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 7 षटकार मारले. 20व्या षटकात न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदीने सलग तीन चेंडूंवर हार्दिक पांड्या, दीपक हुडा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना बाद करून टी-20 मधील दुसरी हॅट्ट्रिक साधली. भारतीय संघाने 20 षटकांत 6 बाद 191 धावा केल्या.

हे सुद्धा वाचा

Chhatrapati Shivaji Maharaj : ‘महाराजांनी औरंगजेबाला माफीसाठी 5 पत्रे लिहिली होती’, भाजप प्रवक्त्याची जीभ घसरली

Ganesh Katkar : भारतीय अन्न महामंडळाच्या सल्लागार समिती सदस्य पदी गणेश काटकर यांची नियुक्ती

Shraddha Walker murder : श्रद्धाने आफताबविरोधात 2020साली केली होती पोलिस तक्रार!

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने पहिल्याच षटकात फिन ऍलनची (00 धावा) विकेट गमावली. याशिवाय डेव्हन कॉनवे आणि केन विल्यमसन यांनी 56 धावांची भागीदारी केली. कॉनवे (25 धावा) बाद झाल्यानंतर दुसऱ्या टोकाकडून ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्या. ग्लेन फिलिप्स (12 धावा), डॅरेल मिशेल (10 धावा), जिमी नीशम (00 धावा), मिचेल सँटनर (02 धावा) फ्लॉप ठरले. केन विल्यमसनने अर्धशतक झळकावले आणि 52 चेंडूत 61 धावांची खेळी करून बाद झाला.

टीम इंडियाची कमान हार्दिक पांड्याकडे आहे, तर या टीममध्ये शुभमन गिल, उमरान मलिक सारखे युवा खेळाडू आहेत. टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी