29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeक्रीडाNZ vs IND : भारताचा 'सुर्या' अजून तळपतोय! किवीं विरोधात झळकावले शानदार...

NZ vs IND : भारताचा ‘सुर्या’ अजून तळपतोय! किवीं विरोधात झळकावले शानदार शतक

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरली. यावेळी सध्या टी20 क्रिकेट क्रमवारीत राज्य करणारा सुर्यकुमार यादव पुन्हा एकदा चमकला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना बे ओव्हल स्टेडियमवर खेळवला जात आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेलिंग्टनमधील मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला असून भारतीय खेळाडू येथे मैदानात उतरण्यास उत्सुक असतील. वर्ल्डनंतर दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. अशा स्थितीत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळते. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरली. यावेळी सध्या टी20 क्रिकेट क्रमवारीत राज्य करणारा सुर्यकुमार यादव पुन्हा एकदा चमकला आहे.

सूर्यकुमार यादवची टी-20 मधील उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या T20 (IND vs NZ) मध्ये उत्कृष्ट शतक झळकावले. या सामन्यांत सुर्याने केवळ 51 चेंडूत 111 धावांची खेळी केली. अशा प्रकारे त्याच्या 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 1100 धावा पूर्ण झाल्या आहेत. जगातील इतर कोणत्याही फलंदाजाला 1000 धावाही पूर्ण करता आल्या नाहीत. सूर्याने 49 चेंडूत शतक पूर्ण केले. 2022 च्या आंतरराष्ट्रीय टी-20 मधील हे त्याचे दुसरे शतक आहे. अशाप्रकारे त्याने रोहित शर्माच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. 2018 मध्ये, रोहितने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 2 शतके झळकावली.

हे सुद्धा वाचा

Shraddha Walker murder : श्रद्धाने आफताबविरोधात 2020साली केली होती पोलिस तक्रार!

Jaya Bachchan : साडीबाबत जया बच्चन यांनी मांडले परखड मत

Russia Ukraine war : युद्धाच्या धामधूमीत ब्रिटनचे पंतप्रधान युक्रेनच्या दौऱ्यावर

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंडमधील बे ओव्हल येथे खेळवला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 191 धावा केल्या आहेत. या सामन्यांत युझवेंद्र चहलचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर उमरान मलिक आणि संजू सॅमसन यांना संघात स्थान मिळालेले नाही. ट्रेंट बोल्टच्या जागी ऍडम मिल्नेचा न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे. पहिला T20 सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. न्यूझीलंड दौऱ्यावर विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी