पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने सलग तीन सामने जिंकून अंतिम फेरी गाठली होती. पण 50 किलो गटात 100 ग्रॅम जास्त वजन असल्याने तिला सुवर्णपदकापूर्वी अपात्र ठरवण्यात आले. तिने दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावर आपल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती कारकिर्दीला निरोपही दिला. मात्र, पदक जिंकण्याची तिची शेवटची आशा अजूनही कायम आहे. (Paris Olympic 2024 sachin tendulkar support vinesh phogat)
विनेश फोगाटला संयुक्त रौप्य पदकासाठी पाहावी लागणार वाट, पॅरिस ऑलिम्पिकच्या शेवटी येईल निर्णय
विनेशने तिच्या अपात्रतेच्या विरोधात क्रीडा लवादाच्या न्यायालयात अपील केले आणि तिला संयुक्त रौप्य पदक देण्याची मागणी केली. त्यासंदर्भात सुनावणी होणार आहे. दरम्यान, भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने विनेश फोगाटच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये विनेश फोगाट निश्चितपणे रौप्य पदक जिंकण्यास पात्र असल्याचे त्याने म्हटले आहे. याचबरोबर सचिनने नियमांचा फेरविचार करण्याची सूचनाही केली आहे. (Paris Olympic 2024 sachin tendulkar support vinesh phogat)
#VineshPhogat #Paris2024 #Olympics @WeAreTeamIndia pic.twitter.com/LKL4mFlLQq
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 9, 2024
सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, “अंपायर कॉलची वेळ!” प्रत्येक खेळाचे नियम असतात आणि कदाचित काही वेळा त्यांचा पुनर्विचार करायला हवा. विनेश फोगट अंतिम फेरीसाठी योग्यरित्या पात्र ठरली होती. अंतिम सामन्यापूर्वी वजनाच्या आधारे तिला अपात्र ठरवणे आणि तिचे रौप्य पदक काढून घेणे हे तर्कशास्त्र आणि खेळाच्या भावनेच्या विरुद्ध आहे.” (Paris Olympic 2024 sachin tendulkar support vinesh phogat)
IND vs SL: मालिका गमावल्यानंतर रोहित शर्माने टीमला घेऊन रागात म्हटली ‘हि’ मोठी गोष्ट
सचिन तेंडुलकर म्हणाले, “एखाद्या खेळाडूला कामगिरी वाढवणाऱ्या औषधांच्या वापरासारख्या नैतिक उल्लंघनासाठी अपात्र ठरवण्यात आले असेल तर ते समजण्यासारखे आहे. अशावेळी कोणतेही पदक न देणे आणि शेवटच्या स्थानावर ठेवणे योग्य ठरेल.” (Paris Olympic 2024 sachin tendulkar support vinesh phogat)
मास्टर ब्लास्टर म्हणाले, “विनेशने तिच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अव्वल दोनमध्ये स्थान मिळविले. ती निश्चितपणे रौप्य पदकाची पात्र आहे. आम्ही सर्व क्रीडा लवादाच्या न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत, परंतु विनेशला मान्यता मिळावी अशी आशा आणि प्रार्थना केली पाहिजे. ती पात्र आहे.” (Paris Olympic 2024 sachin tendulkar support vinesh phogat)