31 C
Mumbai
Saturday, December 14, 2024
Homeक्रीडाParis Olympics 2024: विनेश फोगाटने केला उपांत्य फेरीत प्रवेश 

Paris Olympics 2024: विनेश फोगाटने केला उपांत्य फेरीत प्रवेश 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने दमदार सुरुवात केली आहे. विनेशने 50 किलो महिला कुस्ती गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. विनेश फोगाटने उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा पराभव करून ही कामगिरी केली. फोगाटने हा सामना  सामना 7-5 असा जिंकला. (Paris Olympics 2024 Vinesh Phogat enters in semi-final)

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने दमदार सुरुवात केली आहे. विनेशने 50 किलो महिला कुस्ती गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. विनेश फोगाटने उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा पराभव करून ही कामगिरी केली. फोगाटने हा सामना  सामना 7-5 असा जिंकला. (Paris Olympics 2024 Vinesh Phogat enters in semi-final)

Paris Olympics: नीरज चोप्राची कमाल, पहिल्याच प्रयत्नात ठरला अंतिम फेरीसाठी पात्र

तत्पूर्वी विनेशने 16 सामन्यात जपानच्या युई सुसाकीचा 3-2 असा पराभव केला. चार वेळा विश्वविजेत्या सुसाकीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. विनेशविरुद्धच्या सामन्याच्या शेवटच्या काही सेकंदांपूर्वी तिच्याकडे 2-0 अशी आघाडी होती. तिसरे ऑलिम्पिक खेळत असलेल्या विनेशने तिच्या अनुभवाचा पुरेपूर वापर करून जपानच्या चॅम्पियन कुस्तीपटूला शेवटच्या काही सेकंदात हरवून विजय मिळवला. (Paris Olympics 2024 Vinesh Phogat enters in semi-final)

पुन्हा मैदानावर दिसणार दिनेश कार्तिक, या परदेशी T20 लीगचा होणार भाग

जपाननेही याविरोधात अपील केले पण रेफ्रींनी व्हिडिओ रिप्ले पाहिल्यानंतर तो फेटाळला.तुम्हाला सांगू इच्छिते की, 50 किलोमध्ये विनेश पहिल्यांदाच खेळत आहे. यापूर्वी ती 53 किलोमध्ये खेळायची. विनेशने सुसाकीला पहिल्याच मिनिटांत कोणतीही पकड मिळवण्याची संधी दिली नाही. मात्र, दुसऱ्याच मिनिटाला सुसाकीला आघाडी घेण्यात यश आले. विनेशने आपल्या भक्कम बचावाच्या जोरावर सुसाकीच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. (Paris Olympics 2024 Vinesh Phogat enters in semi-final)

नाशिकमध्ये 6व्या राष्ट्रीय SDPF क्रीडा स्पर्धांचे डॉ.निलेश राणे युवा प्रतिष्ठान तर्फे आयोजन

दुस-या कालावधीतही सुसाकीला विनेशचा बचाव भेदण्यात यश आले नाही, पण तिने एक गुण मिळवत 2-0 अशी आघाडी घेतली. विनेशने शेवटचे काही सेकंद आपले सर्वोत्तम बचाव केले होते आणि तिच्या अचानक आक्रमक वृत्तीने जपानी कुस्तीपटूला सावरण्याची संधी दिली नाही. (Paris Olympics 2024 Vinesh Phogat enters in semi-final)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी