24 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeक्रीडाParis Olympics: नीरज चोप्राची कमाल, पहिल्याच प्रयत्नात ठरला अंतिम फेरीसाठी पात्र

Paris Olympics: नीरज चोप्राची कमाल, पहिल्याच प्रयत्नात ठरला अंतिम फेरीसाठी पात्र

नीरज चोप्राने पॅरिस ऑलिंपिकमध्ये दमदार सुरुवात केली आहे. भारताच्या स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा ब गटातील पात्रता फेरीत प्रथम आला आहे. याने पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर फेक करून धमाकेदार सुरुवात केली आहे. (Paris Olympics Neeraj Chopra qualified for the finals in the first attempt) नीरजने दमदार सुरुवात केली असून, आता त्याच्याकडून अंतिम फेरीतही अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.

नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार सुरुवात केली आहे. भारताच्या स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा ब गटातील पात्रता फेरीत प्रथम आला आहे. याने पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर फेक करून धमाकेदार सुरुवात केली आहे. (Paris Olympics Neeraj Chopra qualified for the finals in the first attempt) नीरजने दमदार सुरुवात केली असून, आता त्याच्याकडून अंतिम फेरीतही अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.

पुन्हा मैदानावर दिसणार दिनेश कार्तिक, या परदेशी T20 लीगचा होणार भाग

नीरज व्यतिरिक्त, त्याचा प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या अर्शद नदीमनेही पहिल्याच प्रयत्नात उत्तम कामगिरी केली आणि 86.59 मीटर फेकून अंतिम फेरीत स्वतःची जागा बनवून घेतली. तुम्हाला सांगू इच्छिते की, विद्यमान ऑलिम्पिक आणि विश्वविजेता नीरजने 87.58 मीटरच्या प्रयत्नाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. (Paris Olympics Neeraj Chopra qualified for the finals in the first attempt)

नाशिकमध्ये 6व्या राष्ट्रीय SDPF क्रीडा स्पर्धांचे डॉ.निलेश राणे युवा प्रतिष्ठान तर्फे आयोजन

भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडू व्यतिरिक्त ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सनेही उत्तम कामगिरी करत पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. पीटर्सने पहिल्याच प्रयत्नात 88.63 फेकले आणि ब गटातून थेट पात्र ठरणारा तिसरा ॲथलीट ठरला. (Paris Olympics Neeraj Chopra qualified for the finals in the first attempt)

IPL 2024: यजुर्वेंद्र चहलने जिंकली पर्पल कॅप, ऑरेंज कॅपवर ‘हा’ स्टार खेळाडू कायम

नीरज पहिल्याच प्रयत्नात सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू ठरला. पहिल्याच प्रयत्नात थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर नीरज आणि अर्शद या दोघांनीही पात्रता फेरीत आणखी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. यानंतर ते दोघेही पुढच्या प्रयत्नात भालाफेक करायला आले नाहीत. अंतिम सामना 8 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 11.50 वाजता होणार आहे. (Paris Olympics Neeraj Chopra qualified for the finals in the first attempt)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी