पाकिस्तान या देशाने 1996 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर कोणत्याही मोठ्या आयसीसी स्पर्धेचे आयोजन केलेले नाही. पाकिस्तान 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाचे सह-यजमान होते, परंतु 2009 मध्ये श्रीलंकेच्या संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर, पाकिस्तानचे यजमान हक्क काढून घेण्यात आले आणि ही स्पर्धा भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये खेळली गेली. (pcb chief mohsin naqvi says Indian team to come to Pakistan for Champions Trophy 2025)
ऋषभ पंत आज साजरा करत आहे आपला 27 वा वाढदिवस
आता बऱ्याच काळानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी पाकिस्तानात होणार आहे. मात्र, या स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार की नाही, याबाबत अजून देखील शंकाच आहे. आता याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचे वक्तव्य समोर आले आहे. (pcb chief mohsin naqvi says Indian team to come to Pakistan for Champions Trophy 2025)
विराट आणि बाबरमध्ये श्रेष्ठ कोण? या पाकिस्तानी दिग्गजाने मांडले मत
पुढील वर्षी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघ पाकिस्तानात येईल, असा विश्वास मोहसिन नक्वी यांना आहे. आठ संघांची ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून तिचा अंतिम सामना 9 मार्चला होणार आहे. स्पर्धेचे सर्व सामने लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथे होणार आहेत. (pcb chief mohsin naqvi says Indian team to come to Pakistan for Champions Trophy 2025)
दोन्ही देशांमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे जुलै 2008 पासून भारताने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही, परंतु असे असतानाही पीसीबी प्रमुख नक्वी यांना विश्वास आहे की भारत पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये खेळू शकेल. चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात येणार आहे. (pcb chief mohsin naqvi says Indian team to come to Pakistan for Champions Trophy 2025)
रविवारी लाहोरमध्ये पत्रकारांशी बोलताना मोहसिन नक्वी म्हणाले, ‘मला भारतीय संघाकडून पूर्ण आशा आहेत. आत्तापर्यंत असे काहीही नाही ज्यामुळे ते पुढे ढकलतील किंवा रद्द करतील. चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी टीम इंडिया पुढच्या वर्षी पाकिस्तानात येणार आहे. आशिया चषक गेल्या वर्षी पाकिस्तानमध्ये खेळला गेला होता, जिथे टीम इंडिया पाकिस्तानला न गेल्यास ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळली गेली होती. येथे भारताने आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले.