31 C
Mumbai
Thursday, May 18, 2023
घरक्रीडाकाय सांगता! कसोटीमध्ये अश्विनच्या नावावर विराट कोहलीपेक्षा जास्त धावा

काय सांगता! कसोटीमध्ये अश्विनच्या नावावर विराट कोहलीपेक्षा जास्त धावा

टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये आपली लय गाठणारा विराट कसोटीच्या फॉरमॅटमध्ये अजूनही संघर्ष करत आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो कसोटी क्रिकेटमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. गेल्या दोन वर्षांत भारतातील कसोटी सामन्यांमध्ये धावा करण्याच्या बाबतीत तो आर अश्विनपेक्षाही मागे पडला आहे.

टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये आपली लय गाठणारा विराट कसोटीच्या फॉरमॅटमध्ये अजूनही संघर्ष करत आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो कसोटी क्रिकेटमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे विराटसह त्याचे चाहते देखील त्याच्या कसोटी क्रिकेटमधील पुनरागमनाची आतुरतेने वाट बघत आहेत. भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये त्याची अवस्था आणखीनच वाईट आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांत भारतातील कसोटी सामन्यांमध्ये धावा करण्याच्या बाबतीत तो आर अश्विनपेक्षाही मागे पडला आहे.

जानेवारी 2021 पासून आत्तापर्यंत म्हणजेच या गेल्या 26 महिन्यांत विराट कोहलीने भारतात एकूण 10 सामन्यांच्या 16 डावांमध्ये 400 धावा केल्या आहेत. भारतात त्याची फलंदाजीची सरासरी केवळ 25 आहे. यादरम्यान त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही. या 16 डावांमध्ये त्याने केवळ दोनच अर्धशते झळकावली आहेत. याउलट, आर अश्विनने या काळात भारतात 11 कसोटी सामन्यांच्या 16 डावात 425 धावा केल्या आहेत. त्याची फलंदाजीची सरासरीही विराटपेक्षा चांगली आहे. अश्विनने 26.56 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे यादरम्यान आर अश्विनने एक शतकही झळकावले आहे. इतकेच नाही तर, गेल्या 26 महिन्यांत घरच्या मैदानावर चौकार आणि षटकार ठोकण्यात आर अश्विन विराट कोहलीच्याही पुढे आहे. अश्विनने 16 डावात 53 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत. तर विराट कोहलीने 16 डावात केवळ 41 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.

हे सुद्धा वाचा

दिलासादायक: राज्यात अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेताचे पंचनामे होणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

UPSC: नोकरदारांना खास संधी..! 577 जागांसाठी नोकरभरती; आजच अर्ज करा

डॉ. विजय चोरमारे लिखीत नव्या पुस्तकाचे आज प्रकाशन !

अक्षर आणि जडेजाची फलंदाजीची सरासरीही कोहलीपेक्षा चांगली आहे
अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा सारख्या फिरकी अष्टपैलूंचीही भारतीय मैदानावर गेल्या 26 महिन्यांत विराट कोहलीपेक्षा चांगली फलंदाजी आहे. जिथे अक्षर पटेलने 14 डावात 38.20 च्या सरासरीने 382 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर जडेजाने 9 डावात 44.75 च्या सरासरीने 358 धावा केल्या आहेत. अक्षरने या कालावधीत तीन अर्धशतके तर जडेजाने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत.

दरम्यान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा आणि शेवटचा सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवणे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोणातून अनिवार्य आहे. त्यामुळे आता या सामन्याततरी विराट कोहली एक उपयुक्त खेळी करत पुनरागमन करत मोठी खेळी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी