33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाRahul Dravid Tests Positive : राहुल द्रविडला कोरोनाची लागण, भारतीय संघापुढे वाढले...

Rahul Dravid Tests Positive : राहुल द्रविडला कोरोनाची लागण, भारतीय संघापुढे वाढले आव्हान

सगळ्यांचेच लक्ष लागलेल्या घेणाऱ्या या आशिया चषकाच्या आधीच राहुल द्रविडला कोरोनाची लागण झाल्याने भारतीय संघापुढे प्रश्न उभा राहिला आहे. शिवाय चषकाच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तान सोबत भारतीय संघाची टक्कर होणार असल्यामुळे भारतीय संघ चांगलाच तयारीत दिसून येत आहे परंतु मुख्य प्रशिक्षकाला ऐनवेळी कोरोना झाल्याने संघाला कोण मार्गदर्शन करणार असे विचारण्यात येत आहे.

येत्या 27 ऑगस्टपासून आशिया चषकाची यूएईमध्ये सुरवात होणार आहे, परंतु हे चषक सुरू होण्यापुर्वीच भारतीय संघापुढे आव्हान वाढले आहे. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. कोरोनाची लागण झाल्याने राहुल द्रविडच्या जागी कोण भूमिका बजावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी पार पाडू शकतात, असा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तान सोबत  होणार असून 28 ऑगस्ट रोजी हा सामना खेळण्यात येणार आहे.

आशिया चषकाची सुरूवात पुढच्या चार दिवसांत म्हणजेच 27 ऑगस्टपासून होणार आहे, तर शेवटचा सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात होणार आहे. सुपर चार साठी सहा सामने होणार आहेत. यामध्ये सुपर फोरचा पहिला सामना 3 सप्टेंबरला शारजहा येथे पार पडणार आहे, तर शेवटचा सामना 9 सप्टेंबरला होणार आहे. सुपर फोरमधील पहिला सामना वगळता बाकी सगळेच सामने दुबईत होणार आहेत.

हे सुद्धा वाचा…

ST Bus : संतप्त प्रकार, महामार्गावर अंधारात लाईटविना धावली एसटी बस

शालेय क्रीडा स्पर्धा पूर्ववत सुरु करण्याची कप‍िल पाटील यांची दीपक केसरकर यांच्याकडे मागणी

Sonam Kapoor : सोनम कपूरच्या ‘आई’ पणाचे केले सर्वांनी कौतुक

सगळ्यांचेच लक्ष लागलेल्या घेणाऱ्या या आशिया चषकाच्या आधीच राहुल द्रविडला कोरोनाची लागण झाल्याने भारतीय संघापुढे प्रश्न उभा राहिला आहे. शिवाय चषकाच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तान सोबत भारतीय संघाची टक्कर होणार असल्यामुळे भारतीय संघ चांगलाच तयारीत दिसून येत असला तरीही मुख्य प्रशिक्षकाला ऐनवेळी कोरोना झाल्याने संघाला कोण मार्गदर्शन करणार असे विचारण्यात येत आहे. त्याचवेळी व्हीव्हीएस लक्ष्मण हे द्रविड यांच्या जागी काम बघणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यात राहुल द्रविडसह फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांना विश्रांती दिली होती म्हणून हे तिघे सुद्धा दुबईत होणाऱ्या आशिया चषकात सहभागी होणार होते परंतु आता चित्र काहीसे वेगळे दिसून येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी