32 C
Mumbai
Tuesday, September 6, 2022
घरक्रीडाRape Case : बास्केटबाॅल सरावाच्या वेळी बलात्काराचा प्रयत्न, खेळाडू गंभीर जखमी

Rape Case : बास्केटबाॅल सरावाच्या वेळी बलात्काराचा प्रयत्न, खेळाडू गंभीर जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा शोध घेतला जात असून पीडित मुलीचा जवाब नोंदवून घेतल्याचे म्हटले आहे. पीडित मुलीला लुधियानामधील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्या दोन्ही पायाला आणि जबड्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी म्हटले आहे.

बास्केटबाॅल खेळणाऱ्या महिला खेळाडूवर तीन जणांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला प्रतिकार केल्यामुळे तिला स्टेडिअमच्या छतावरून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 18 वर्षे वय असणारी ही तरुणी या घटनेत गंभीर जखमी झाली असून उंचावरून पडल्याने शरीरात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहेत. पंजाबच्या मोगा जिल्ह्यात ह्रदय हेलावून टाकणारी ही घटना घडली असून पीडित खेळाडूला लुधियाना येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटना 12 ऑगस्ट रोजी घडली असून या घटनेला जबाबदार असणारे तीनही आरोपी फरार झाले आहेत, तर या प्रकरणी पोलिस आणखी तपास करीत आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, सदर खेळाडू मुलगी बास्केटबॉलचा सराव करण्यासाठी मोगा स्टेडिअमवर गेली असता जतिन कांडा या तरुणाने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आणखी दोन जणांनी सुद्धा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या तरुणीने पळ काढला आणि थेट स्टेडिअमचे छत गाठले. त्यावेळी कांडाने तिला पकडण्याच्या नादात 25 फूट उंचीवरून ढकलून दिले. उंचावरून पडल्याने पीडिता गंंभीर जखमी झाली असून याबाबत तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे.

हे सुद्धा वाचा…

Mumbai Building Collapsed : काही क्षणातच इमारत पत्त्यांसारखी कोसळली; बोरिवलीमध्ये घडली दुर्घटना

Maharashtra Sea : महाराष्ट्राचा समुद्र किनारा सुरक्षित आहे का ?

Defense Journalism Course : होय! संरक्षण पत्रकारितेचा लवकरच कोर्स सुरू

याप्रकरणी तीनही आरोपींविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्यांच्यावर भारतीय दंड संहिताचे कलम 307 (खूनाचा प्रयत्न) आणि 376 (बलात्कार) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा शोध घेतला जात असून पीडित मुलीचा जवाब नोंदवून घेतल्याचे म्हटले आहे. पीडित मुलीला लुधियानामधील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्या दोन्ही पायाला आणि जबड्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी म्हटले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी