23 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
Homeक्रीडारविचंद्रन अश्विनआधी ‘या’ खेळाडूंनी केली होती मालिकेच्या मध्यात निवृत्तीची घोषणा 

रविचंद्रन अश्विनआधी ‘या’ खेळाडूंनी केली होती मालिकेच्या मध्यात निवृत्तीची घोषणा 

याआधी देखील माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे आणि महेंद्रसिंग धोनी यांनीही असे केले आहे. (ravichandran ashwin joins MS dhoni and Anil kumble club after retiring in the middle of the series)

भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेच्या मध्यात निवृत्ती जाहीर केली. असे पहिल्यांदा झाले नाही, याआधी देखील माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे आणि महेंद्रसिंग धोनी यांनीही असे केले आहे. (ravichandran ashwin joins MS dhoni and Anil kumble club after retiring in the middle of the series)

रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीच्या वेळेवर संतापले सुनील गावसकर

महेंद्र सिंग धोनीने 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर अनिल कुंबळेने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.  अशाप्रकारे अश्विन आणि धोनी यांनी ऑस्ट्रेलियात शेवटची कसोटी खेळली होती तर कुंबळेने बोटाला दुखापत झाल्यामुळे 2008 मध्ये नवी दिल्लीत झालेल्या सामन्यानंतर निवृत्ती जाहीर केली होती. (ravichandran ashwin joins MS dhoni and Anil kumble club after retiring in the middle of the series)

रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली

2008 मध्ये तिसऱ्या कसोटीनंतर कुंबळेने निवृत्ती जाहीर केली तेव्हा भारत चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर होता. अखेर भारताने मालिका 2-0 ने जिंकली. धोनीने डिसेंबर 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत 0-2 ने पिछाडीवर असताना चार कसोटी सामन्यांच्या मालिकेदरम्यान निवृत्तीची घोषणा केली. त्याचा हा निर्णय धक्कादायक होता कारण याआधी त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे कोणतेही संकेत दिले नव्हते. (ravichandran ashwin joins MS dhoni and Anil kumble club after retiring in the middle of the series)

अश्विनचा निर्णयही आश्चर्यकारक होता, तोही संघ त्याच्यावर खूप अवलंबून असताना. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. (ravichandran ashwin joins MS dhoni and Anil kumble club after retiring in the middle of the series)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी