भारतीय क्रिकेट संघाचा विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा आज आपला 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने पंतला त्याच्या चाहते, क्रिकेटपटू आणि कुटुंबीयांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 2017 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण करणारा पंत खूप कमी वयात स्टार क्रिकेटर बनला आहे. (Rishabh pant birthday)
विराट आणि बाबरमध्ये श्रेष्ठ कोण? या पाकिस्तानी दिग्गजाने मांडले मत
30 डिसेंबर 2022 ला पंतचा कार अपघात झाला होता. त्यानंतर तो बरेच दिवस मैदानापासून दूर होता तेव्हा चाहत्यांना या खेळाडूची खूप आठवण आली. पण आता हा धाडसी खेळाडू क्रिकेटच्या मैदानात परतला आहे. (Rishabh pant birthday)
बाबर आझमने पाकिस्तानचे कर्णधारपद का सोडले? खरे कारण आले समोर
पंत आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना दिसला होता. ही स्पर्धा पंतसाठी चांगलीच होती. आता त्याच्या वाढदिवसाच्या खास निमित्त ऋषभ पंतची बहीण साक्षी पंतने तिच्या धाकट्या भावासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. (Rishabh pant birthday)
View this post on Instagram
साक्षी पंत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आता तिने आपल्या भावाच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये साक्षीने लिहिले, “माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. जरी मी मोठा झाली तरी तू नेहमीच माझे रक्षण केलेस. मला नेहमी सांभाळून घेण्यासाठी धन्यवाद. मी तुझ्यावर खूप प्रेम करते.” (Rishabh pant birthday)
Happy Birthday to our wicketkeeper batter, @RishabhPant17. Your journey and comeback has been an inspiration for many. Hope you keep making key contributions to the Indian team’s success in the future as well. pic.twitter.com/WuLt8asPGU
— Jay Shah (@JayShah) October 4, 2024
आम्ही तुम्हाला सांगतो, 2022 मध्ये ऋषभ पंतचा त्याच्या घरी जात असताना कारचा भीषण अपघात झाला होता. ज्यात त्याचा जीव वाचला. यानंतर पंतला बराच काळ क्रिकेटच्या मैदानाबाहेर राहावे लागले. पण पंतने आता क्रिकेटच्या मैदानावर शानदार पुनरागमन केले आहे. पंतने बांगलादेशसोबत खेळलेल्या कसोटी मालिकेत अप्रतिम शतक झळकावले होते. आता पंत न्यूझीलंडसोबत कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे. (Rishabh pant birthday)