23 C
Mumbai
Sunday, December 15, 2024
Homeक्रीडाBCCI चे नवीन सचिव होणार नाही रोहन जेटली, जाणून घ्या कारण 

BCCI चे नवीन सचिव होणार नाही रोहन जेटली, जाणून घ्या कारण 

शाह यांच्या जाण्यानंतर रोहन जेटली बीसीसीआयच्या पुढील सचिवपदाची जबाबदारी स्वीकारतील, असे मानले जात होते. मात्र आता तसे होताना दिसत नाही. (Rohan Jaitley Won't Be New BCCI Secretary)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह 30 नोव्हेंबर रोजी बीसीसीआय सचिव म्हणून कार्यकाळ संपवतील आणि 1 डिसेंबर रोजी नवीन आयसीसी अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारतील. शाह यांच्या जाण्यानंतर रोहन जेटली बीसीसीआयच्या पुढील सचिवपदाची जबाबदारी स्वीकारतील, असे मानले जात होते. मात्र आता तसे होताना दिसत नाही. (Rohan Jaitley Won’t Be New BCCI Secretary)

अंपायरसोबत पंगा घेणे या खेळाडूला पडले महागात, ICC ने केली मोठी कारवाई

रोहन जेटली सध्या दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (DDCA) चे विद्यमान अध्यक्ष आहेत. मात्र आता त्यांनी दुसऱ्यांदा दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. म्हणजेच ते बीसीसीआयच्या नव्या सचिवपदाच्या शर्यतीत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते बीसीसीआयचे नवे सचिव होऊ शकतात, अशा बातम्या येत होत्या. मात्र आता उमेदवारी दाखल करून त्यांनी बीसीसीआयच्या नव्या सचिवाबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. (Rohan Jaitley Won’t Be New BCCI Secretary)

पाकिस्तानने अचानक बदलला कर्णधार, आता या खेळाडूकडे आली जबाबदारी

रोहन जेटली यांच्याशिवाय कीर्ती आझाद यांनीही डीडीसीएच्या नवीन अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. 13 ते 15 डिसेंबर दरम्यान या निवडणुका होणार असून, 16 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. गेल्या निवडणुकीत रोहन जेटली 1558 मतांनी विजयी झाले होते. (Rohan Jaitley Won’t Be New BCCI Secretary)

कीर्ती आझाद यांनी निवडणुकीपूर्वी रोहन जेटली यांच्यावर गंभीर आरोप केले होते आणि त्यांनी डीडीसीएमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा दावा केला होता. दुसरीकडे, गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल हे बीसीसीआयचे सचिव म्हणून जय शाह यांच्या जागी आघाडीवर आहेत. रोहन जेटली यांच्यानंतर आता त्यांचे नाव आघाडीवर आहे. (Rohan Jaitley Won’t Be New BCCI Secretary)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी