29 C
Mumbai
Monday, September 11, 2023
घरक्रीडाRohit Sharma : विराट कोहलीने गमविले, ते रोहित शर्मा परत मिळवणार

Rohit Sharma : विराट कोहलीने गमविले, ते रोहित शर्मा परत मिळवणार

Inadia Vs Pakistan लढतीकडे दोन्ही देशांचे लक्ष लागले आहे. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास भारत सरकारने बंदी घातलेली आहे. त्यामुळे द्विपातळीवर भारत व पाकिस्तानचे सामने होत नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ (ICC) अथवा तत्सम आयोजकांनी आयोजित केलेल्या स्पर्धांमध्येच भारत व पाकिस्तान यांच्यातील लढत पाहायला मिळते. त्यामुळेच या महिन्यात होऊ घातलेल्या सामन्याकडे दोन्ही देशांतील क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षी T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा लाजिरवाणा पराभव केला होता. हा पराभव समस्त भारतीयांच्या भावनांना ठेच पोहचवणारा होता. आता वर्षभराच्या विलंबाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पाकिस्तानच्या विरोधात ‘त्या’ पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळाली आहे. आशिया कप स्पर्धेच्या माध्यमातून ही संधी भारताला गवसणार आहे. आशिया कप स्पर्धेत येत्या २८ ऑगस्ट रोजी भारत व पाकिस्तान संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्याकडे भारत व पाकिस्तानातील क्रिकेट रसिकांचे लक्ष लागलेले आहे. दोन्ही (Rohit Sharma) देशांतील पाठिराखे आपलाच संघ जिंकेल अशी मनोकामना व्यक्त करीत आहेत.

एक काळ असा होता की, भारत व पाकिस्तान दोन्ही संघ ‘एकास एक वरचढ’ असे होते. ९० च्या दशकात पाकिस्तानकडे भेदक गोलंदाज असायचे. परंतु साधारण सन २००० नंतर पाकिस्तानी संघाची कामगिरी हळूहळू घसरत गेली.
गेल्या काही वर्षांत तर पाकिस्तानची अवस्था दयणीय झाली होती. दुबळा संघ म्हणून पाकिस्तानला हिणवले जात होते. गेल्या चार – पाच वर्षांत भारताने पाकिस्तानचा पालापाचोळा करून टाकला होता.

हे सुद्धा वाचा

मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई पोलिसांचे 14.82 कोटी रुपये थकविले, अनिल गलगली यांची माहिती

स्मृती मंधानाने ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयरचा किताब जिंकला

‘कौन प्रवीण तांबे’ बायोपिक पाहून क्रिकेटपटू प्रवीण तांबें झाला भावूक

मात्र गेल्या वर्षी T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने अचाट कामगिरी केली. बाबर आझमने भारतीय संघाला सातवे अस्मान दाखविले. तब्बल १० खेळाडू राखून पाकिस्ताने भारताचा पराभव केला. आमचा संघ दुबळा नसून मजबूत असल्याचा इशाराच बाबर आझमच्या टीमने दिला होता.

त्यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करीत होता. आता ही धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर आली आहे. इंग्लंड व वेस्ट इंडिजच्या विरोधातील ताज्या सामन्यांमध्ये भारतीय संघाने मजबूत कामगिरी केलेली आहे. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानच्या चारी मुंड्या चीत करेल, अशी आशा भारतीय पाठीराख्यांना आहे.

विशेषतः कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, श्रेयस अय्यर, इशान किशन इत्यादी खेळाडू फॉर्मात आहेत. गोलंदाजांची तगडी फळी भारताकडे उपलब्ध आहे. त्यामुळे भारतीय संघ मागील पराभवाची सव्याज परतफेड करेल, असे भारतीय चाहत्यांना वाटत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी