31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeक्रीडाSA vs BAN: दक्षिण आफ्रिकेला बसला मोठा धक्का, बांगलादेश विरुद्ध दुसऱ्या सामन्यात...

SA vs BAN: दक्षिण आफ्रिकेला बसला मोठा धक्का, बांगलादेश विरुद्ध दुसऱ्या सामन्यात खेळणार नाही ‘हा’ स्टार खेळाडू 

दुसऱ्या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. (sa vs ban 2nd test temba bavuma will miss test match)

बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पण, दुसऱ्या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. (sa vs ban 2nd test temba bavuma will miss test match)

IND vs NZ: वॉशिंग्टन सुंदरच्या जादुई चेंडूला समजू नाही शकला फलंदाज आणि…

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. पहिल्या सामन्यातही तो खेळू शकला नाही. त्याच्या डाव्या खांद्याचे स्नायू ताणले गेले होते. या दुखापतीमुळे तो पहिल्या सामन्यातही खेळू शकला नाही. (sa vs ban 2nd test temba bavuma will miss test match)

यावेळी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने सांगितले होते की बावुमा ढाका येथे जाईल आणि दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी त्याचे पुनर्वसन सुरू ठेवेल. आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान बावुमाला ही दुखापत झाली होती. यामुळे तो या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. (sa vs ban 2nd test temba bavuma will miss test match)

IND vs NZ: आर अश्विनने इतिहास रचला, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये मोठा पराक्रम केला

टेंबा बावुमाच्या अनुपस्थितीत एडन मार्कराम संघाचे नेतृत्व करेल. टेम्बा बावुमाच्या जागी देवाल्ड ब्रेव्हिसचा समावेश करण्यात आला आहे. त्याला प्रथमच कसोटी संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय या मालिकेत नांद्रे बर्जरच्या जागी लुंगी एनगीडीचा संघात समावेश करण्यात आला होता. कंबरेला ताण आल्याने नांद्रे बर्जर बांगलादेश दौऱ्यातून बाहेर पडला.

दक्षिण आफ्रिकेचा संघ: डेव्हिड बेडिंगहॅम, मॅथ्यू ब्रिट्झके, डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी झोर्झी, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, सेनुरन मुथुसामी, लुंगी एनगिडी, डेन पॅटरसन, डेन पिएड, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, रियान रिकेल्टन, काइल वेरिन.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी