26 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरक्रीडाShoaib Akhtar : मला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे, शोएब अख्तरचा व्हिडिओ व्हायरल

Shoaib Akhtar : मला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे, शोएब अख्तरचा व्हिडिओ व्हायरल

शोएब यांच्या गुडघ्यावर नुकतीच मोठी सर्जरी करण्यात आली. या सर्जरीनंतर चाहत्यांना सर्जरीविषयी, तब्येतीविषयी सांगण्यासाठी शोएब अख्तरने व्हिडिओच जारी केला आहे. यामध्ये मला तुमच्या प्रार्थनेची गरज असल्याचे त्याने चाहत्यांना सांगितले आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यावर हजारो – लाखो लोकांनी प्रतिसाद देत आपल्या लाडक्या खेळाडूला प्रतिसाद दिला आहे. शोएब यांच्या गुडघ्यावर नुकतीच मोठी सर्जरी करण्यात आली. या सर्जरीनंतर चाहत्यांना सर्जरीविषयी, तब्येतीविषयी सांगण्यासाठी शोएब अख्तरने व्हिडिओच जारी केला आहे. यामध्ये मला तुमच्या प्रार्थनेची गरज असल्याचे त्याने चाहत्यांना सांगितले आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ म्हणून ओळखला जातो. शोएब शरीरयष्ठीने धिप्पाड असल्याने त्याचा रनअप चांगला असायचा त्यामुळे चांगल्या चांगल्या फलंदाजांना त्याची दहशत असायची.

क्रिकेट विश्वात कधीकाळी दहशत असणाऱ्या शोएब अख्तर या माजी क्रिकेटपटूने इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये शोएब अख्तर म्हणतो, “सर्जरीवरून आलोय मी..पाच – सहा तासांची सर्जरी होती दोन्ही गुडघ्यांची.. खूप वेदना होताहेत..पण मला तुमच्या प्राथनेची गरज आहे. कदाचित ही शेवटची सर्जरी असेल.. निवृतीच्या 12 वर्षांनंतर सुद्धा 4 ते 5 वर्षे मी क्रिकेट खेळू शकलो असतो..पण मला माहित होतं की मला व्हिलचेअरवर आयुष्य काढावं लागेल, म्हणून मी क्रिकेट सोडून दिले.” असे शोएब याने यावेळी सांगितले.

हे सुद्धा वाचा

Shilpa Bodkhe : आधारकार्ड नसल्याने रुग्णालयाने महिलेला प्रसुतीसाठी नाकारले

Sharad Pawar : भाजपने एकनाथ शिंदेंना का फोडले, शरद पवारांनी सांगितले कारण

Azadi Ka Amrit Mahotsav : राज्यपालांचा ‘अमराठी बाणा’, आधी ‘मराठी’ कलावंतांना डावलले, नंतर ‘अमराठी’ कार्यक्रमाचे थाटात उदघाटन केले !

दरम्यान, या व्हिडिओनंतर चाहत्यांनी कमेंटबाॅक्समध्ये गर्दी करत शोएब लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना केली आहे.
शोएब सध्या ऑस्ट्रेलियामध्ये असून डाॅक्टकांनी सक्त आराम सांगितल्याने त्यांने केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधण्याचा पर्याय निवडला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी