23 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
Homeक्रीडास्मृती मानधनाने रचला इतिहास, असा विक्रम करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू 

स्मृती मानधनाने रचला इतिहास, असा विक्रम करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू 

मानधनाने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. 109 चेंडूंचा सामना करताना भारतीय फलंदाजाने 105 धावांची शानदार खेळी केली. (smriti mandhana four century in an calendar year)

टीम इंडियाची ओपनिंग बॅट्समन स्मृती मानधनाने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मानधनाने असे स्थान मिळवले आहे. जे जगातील इतर कोणत्याही महिला खेळाडूला गाठता आलेले नाही. मानधनाने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. 109 चेंडूंचा सामना करताना भारतीय फलंदाजाने 105 धावांची शानदार खेळी केली. (smriti mandhana four century in an calendar year)

तिसऱ्या कसोटीमध्ये रोहित शर्माने ‘या’ क्रमांकावर खेळायला हवे: सुरेश रैना

एका कॅलेंडर वर्षात चार शतके झळकावणारी मानधना पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. मात्र, त्याची खेळीही भारतीय संघाला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून देऊ शकली नाही आणि ऑस्ट्रेलियाने 83 धावांनी 3-0 अशी मालिका जिंकली. (smriti mandhana four century in an calendar year)

स्मृती मानधना तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघासाठी एकटी लढताना दिसली. मानधनाने शानदार फलंदाजी करत 105 चेंडूत 109 धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान मानधनाने 14 चौकार आणि एक षटकार लगावला. 

पाकिस्तानचा गोलंदाज हरिस रौफ बनला आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’

टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाचे हे वर्षातील चौथे शतक होते. यासह, ती एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके झळकावणारी फलंदाज बनली आहे. यापूर्वी मानधनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन शतके झळकावली होती, तर न्यूझीलंडविरुद्ध एक शतक तिच्या बॅटने झळकावले होते. (smriti mandhana four century in an calendar year)

मात्र, स्मृती मानधनाची शतकी खेळी व्यर्थ गेली. भारतीय संघाला तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाकडून 83 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 गडी गमावून 298 धावा केल्या. ॲनाबेले सर्डलँडने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले, तर ॲशले गार्डनरने 64 चेंडूत 50 धावांचे योगदान दिले. तर ताहिला मॅकग्राने नाबाद 56 धावा केल्या. (smriti mandhana four century in an calendar year) 

299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण भारतीय संघ केवळ 215 धावांवरच गडगडला. मानधनाने आपल्या बॅटने 105 धावांची शानदार खेळी केली. मात्र, तिला दुसऱ्या टोकाकडून उर्वरित फलंदाजांची साथ मिळू शकली नाही. हरलीन देओलने 39 धावा केल्या. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका 3-0 ने जिंकली. (smriti mandhana four century in an calendar year)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी