वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पॉइंट टेबलमध्ये मोठे फेरबदल झाले आहे. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा पराभव करून डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये पहिला नंबर गाठला आहे. आता एक सामना जिंकून दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. मात्र, दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर पोहोचल्यानंतर डब्ल्यूटीसी अंतिम गुणांच्या प्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (South Africa tops the WTC final points table)
RCBचा नवा कर्णधार होणार कृणाल पंड्या? फ्रँचायझीच्या पोस्टने उडाली खळबळ
कसोटी क्रिकेट अधिक रोमांचक बनवण्यासाठी आणि चाहत्यांचे लक्ष त्याकडे आकर्षित करण्यासाठी, ICC ने 2019 मध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सुरू केली. ज्यामध्ये टॉप-9 संघ ठेवण्यात आले आहेत. याशिवाय टॉप-2 संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जातो. विजयाच्या टक्केवारीनुसार संघाला गुणतालिकेत स्थान मिळते. मात्र, हा नियम काही संघांसाठी तोट्याचा ठरला आहे. आता या स्पर्धेच्या स्वरूपावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत कारण काही संघ 10 सामने खेळतात, काही 15 तर काही 20. (South Africa tops the WTC final points table)
South Africa will Qualify for the WTC Final if they win 1 Test vs Pakistan out of 2 Test Matches 🧐#INDvsAUS pic.twitter.com/1QljLBOBUL
— Richard Kettleborough (@RichKettle07) December 9, 2024
विराट कोहलीला रूटपेक्षा सरस म्हणणे माजी कांगारू प्रशिक्षकाला पडले महाग
विजयांच्या दृष्टीने सामन्यांवर नजर टाकली तर सर्वाधिक सामने जिंकणारा संघ टॉप-4 मध्येही नाही. होय, इंग्लंडने आतापर्यंत सर्वाधिक 11 सामने जिंकले आहेत पण हा संघ पाचव्या क्रमांकावर आहे कारण इंग्लंडच्या विजयाची टक्केवारी कमी आहे. इंग्लंडने 21 सामने खेळले आहेत. दुसरीकडे, आफ्रिकेने 10 सामने खेळले असल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 6 सामने जिंकून पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. अशा स्थितीत हा नियम इंग्लंडसारख्या संघासाठी तोट्याचा सौदा ठरत आहे. (South Africa tops the WTC final points table)
सध्या, दक्षिण आफ्रिका 63.33 च्या विजयाच्या टक्केवारीसह WTC अंतिम गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया 60.71 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय ॲडलेड कसोटीत भारताचा ऑस्ट्रेलियाकडून [पराभव झाला. यामुळे भारतीय संघ 57.29 विजयाच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर घसरली आहे. तर श्रीलंका चौथ्या आणि इंग्लंड पाचव्या स्थानावर कायम आहे. (South Africa tops the WTC final points table)