34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाGirish Mahajan : क्रीडा धोरणाबाबत क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला सकारात्मक...

Girish Mahajan : क्रीडा धोरणाबाबत क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला सकारात्मक पवित्रा

नवीन मंत्री मंडळातले क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी क्रीडा धोरणाला प्रोत्साहन देण्याचे ठरव‍िले आहे. ‍आपल्या देशात सगळी रिक्त पदे भरली पाहिजेत. आजपासून 15 दिवसांत 80 क्रीडा शिक्षकांची पदं भरली जातील. जर नाही झाले तर माझ्यावर हक्कभंग तुम्ही आणू शकता.

नवीन मंत्री मंडळातले क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी क्रीडा धोरणाला प्रोत्साहन देण्याचे ठरव‍िले आहे. ‍यावेळी आपले मत मांडतांना ते म्हणाले की, इतर देशांच्या तुलनेमध्ये आपल्याकडे क्रीडा धोरणाकडे चांगले‍ लक्ष दिले जात नाही. क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी विधासभेमध्ये आपले विविध विषयांवर म्हणणे मांडले. क्रीडा संकुलाच्या बाबतीमध्ये आपण वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. गिरीश महाजन यावेळी म्हणाले की, क्रीडा विभागाला आपण जसा न्याय दिला पाहिजे तसा आपण देत नाही. इतर राज्यांशी तुलना केली तर आपला देश न्याय देत नाही.

आपल्या देशात सगळी रिक्त पदे भरली पाहिजेत. आजपासून 15 दिवसांत 80  क्रीडा शिक्षकांची पदं भरली जातील. जर नाही झाले तर माझ्यावर हक्कभंग तुम्ही आणू शकता. त्यामुळे ही भरती प्रक्रिया किती वेगाने राबव‍िवी लागणार आहे. आम्ही ग्रामीण भागात क्रीडा साहित्य देणार आहोत. पाच लाखांपर्यंत साहित्य ग्रामीण भागात देऊ शकतो.

अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कार मिळविणाऱ्या खेळाडूंचा सन्मान केला पाहिजे. त्यांच्याशी चर्चा झाली पाहिजे. खेळाला प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अपूर्ण असलेली क्रीडा संकुले लवकरच पूर्ण होतील असे वचन गिरीश महाजन यांनी दिले. हा‍ निर्णय घेऊन 13 वर्षे झाली. तरी देखील 124 तालुक्यांमध्ये क्रीडा संकुलांना जागा मिळाली नाही. त्यामुळे काय अडचणी आहेत. त्यासाठी बैठक घेऊन त्यातून मार्ग काढू असेही गिरीश महाजन यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Ambadas Danve : सरकारने अंबादास दानवे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे दिले आश्वासन

Ajit Pawar : फडणवीसांचे म‍ित्र प्रेम,अजित पवारांकडेच ‘देवगिरी’ बंगल्याच्या चाव्या

Jayant Patil : जयंत पाटील यांनी व‍िधानसभा अध्यक्षांवरच डागली तोफ !

कोरोना महामारीचे संकट आल्यापासून आपल्या देशातील मैदाने ओस पडली होती. आता निर्बंध काढण्यात आल्यामुळे मैदाने फुललेली दिसतात. या वर्षी अजून शाळांमधील क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे खेडाळूंचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. गिरीश महाजन यांनी सांगितल्याप्रमाणे क्रीडा धोरण अवलंबले तर नक्कीच नवी खेळाडू तयार होण्यास मदत होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी