श्रीलंका संघ वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. पहिला सामना 20 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यात श्रीलंकेचा स्टार खेळाडू पथुम निसांका दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याच्या जागी निशान मदुशंकाचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. मधुशंका प्रथमच श्रीलंकेसाठी एकदिवसीय सामन्यात सहभागी होणार आहे. (sri lanka vs west indies first odi pathum nissanka ruled out of team)
‘कांगारू गोलंदाजांसाठी डोकेदुखी बनणार सरफराज खान’: संजय मांजरेकर
पल्लेकेले येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, या सामन्यात श्रीलंकेला मोठा धक्का बसला. पथुम निसांका दुखापतीमुळे प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकला नाही. निसांका हा श्रीलंकेच्या संघातील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्याची अनुपस्थिती लंकेसाठीही मोठा धक्का मानली जात आहे. त्याने श्रीलंकेसाठी 58 एकदिवसीय सामन्यांमध्ये 43.88 च्या उत्कृष्ट सरासरीने 2326 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 6 शतके आणि 14 अर्धशतकांची नोंद आहे. (sri lanka vs west indies first odi pathum nissanka ruled out of team)
After a strong T20I series, can Sri Lanka keep the momentum going in the ODIs?
Pathum Nissanka is out injured, while Nishan Madushka will make his ODI debut in Kandy
Live: https://t.co/YtKg27AfIg | #SLvWI pic.twitter.com/0cJYmFJaMg
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 20, 2024
WTC पॉइंट्स टेबल: एका पराभवामुळे भारतीय संघाला बसला मोठा धक्का, जाणून घ्या
निशांकाच्या जागी निशान मदुशंकाने पदार्पण केले. त्याने श्रीलंकेसाठी 10 कसोटी सामने खेळले आहेत. मात्र या सामन्यातूनच तो वनडेमध्ये पदार्पण करत आहे. मदुशंकाने श्रीलंकेसाठी 10 कसोटी सामन्यात 33.58 च्या सरासरीने 571 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर 1 शतकाव्यतिरिक्त 2 अर्धशतके आहेत. (sri lanka vs west indies first odi pathum nissanka ruled out of team)
वेस्ट इंडिजविरुद्ध श्रीलंकेचे प्लेइंग इलेव्हन
निशान मदुष्का, कुसल मेंडिस (wk), अविष्का फर्नांडो, कामिंदू मेंडिस, चारिथ असालंका (c), सदिरा समराविक्रामा, जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, डुनिथ वेलालागे, जेफ्री वँडरसे, असिथा फर्नांडो. (sri lanka vs west indies first odi pathum nissanka ruled out of team)