32 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeक्रीडाSuresh Raina Retirement: सुरेश रैना आंतरराष्ट्रीय तसेच आयपील क्रिकेटमधून निवृत्त

Suresh Raina Retirement: सुरेश रैना आंतरराष्ट्रीय तसेच आयपील क्रिकेटमधून निवृत्त

भारताचा मध्यला फळीतला डावखुरा फंलदाज सुरेश रैनाने (Suresh Raina) आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट (Cricket) स्पर्धेत खेळले जाणारे तिन्ही प्रकार तसेच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) (IPL) मधून निवृत्त होण्याची घोषणा केली. रैना २०२१ पर्यंत चार वेळा आयपील विजेता राहिलेल्या चैन्नई सुपर किंग्स संघाचा एक प्रमुख खेळाडू होता.

भारताचा मध्यला फळीतला डावखुरा फंलदाज सुरेश रैनाने (Suresh Raina) आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट (Cricket) स्पर्धेत खेळले जाणारे तिन्ही प्रकार तसेच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) (IPL) मधून निवृत्त होण्याची घोषणा केली. रैना २०२१ पर्यंत चार वेळा आयपील विजेता राहिलेल्या चैन्नई सुपर किंग्स संघाचा एक प्रमुख खेळाडू होता. परंतु २०२२ च्या हंगामात चैन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) त्याचा संघात समावेश न निर्णय घेतल्याने त्याला २०२२ मध्ये पार पडलेल्या आयपील मध्ये खेळता आले नव्हते. रैनाने अबुधाबी मध्ये झालेल्या आयपील २०२१ च्‍या हंगामात राजस्थान रॉयल्स विरूद्ध झालेल्या सामन्यात चैन्नई सुपर किंग्सतर्फे मैदानात शेवटचा उतरला होता.

सुरेश रैना कित्येक वर्ष भारतीय क्रिकेट संघाचा एक अविभाज्य भाग होता. त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट अशा तिन्ही प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व केले. परंतु मर्यादित षटकांच्या प्रकारात मधल्या फळीतील आक्रमक फंलदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक म्हणून तो नावारूपाला आला.

रैना २०११ मध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या भारतीय संघाचादेखील एक प्रमुख भाग होता. त्याने २२६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३५.३१ च्या सरासरीने  एकूण ५६१५ धावा केल्या. तर ७८ टी-२० सामन्यांमध्ये १०६५ धावा केल्या. टी-२० सामन्यांमध्ये भारतातर्फे पहिले शतक झळकावण्याचा विक्रमही रैनाचा नावावर आहे.

३५ वर्षीय रैनाने १५ ऑगस्ट २०२० रोजी त्यांचा भारतीय क्रिकेट संघातील सहकारी आणि भारताचा पूर्व कर्णधार महेंद्रसिंग धोनी समवेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त स्वीकारली होती.

हे सुद्धा वाचा –

Asia Cup 2022: भारताला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी श्रीलंकेविरूद्ध जिंकणे अंत्यत निकडीचे

Navneet Rana : तु ठाकरे है, तो मै राणा हूँ !

Mission Baramati : ‘स्वत:ला पक्षात उमेदवारी मिळेना अन् बारामती जिंकणार म्हणे…’

आज रैनाने ट्वीटरवर एक पत्रक जारी करून त्याने भारतात होणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि आयपील मधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. त्याने आपल्या पत्रकातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), उत्तर प्रदेश किकेट बोर्ड, चैन्नई सुपर किंग्स, बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि त्याच्या चाहत्यांच्या प्रेमाबद्दल व पाठिंब्याबद्दल आभार मानले.

भारतामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी करारबद्दल झालेल्या खेळाडूंना विदेशात खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास मनाई आहे. परंतु  आता रैनाने आयपीलमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याला विदेशात खेळल्या जाणाऱ्या इतर आंतरराष्ट्रीय टी-२० लीग्समध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आमचे युट्युब चॅनेल सुद्धा सबस्क्राईब करा –

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी