30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeक्रीडाT20 World Cup : टी 20 विश्वचषकाचा पहिला फायनलिस्ट फिक्स!

T20 World Cup : टी 20 विश्वचषकाचा पहिला फायनलिस्ट फिक्स!

टी20 विश्वचषक 2022चा पहिला उपांत्य सामना बुधवारी (9 नोव्हेंबर) पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला. यावेळी पाकिस्तानी संघाने न्यूझीलंडवर 7 विकेट्सने मात करत अंतिम सामन्यात आपली जागा पक्की केली आहे.

टी20 विश्वचषक 2022चा पहिला उपांत्य सामना बुधवारी (9 नोव्हेंबर) पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला. यावेळी पाकिस्तानी संघाने न्यूझीलंडवर 7 विकेट्सने मात करत अंतिम सामन्यात आपली जागा पक्की केली आहे. T20 विश्वचषक 2022 चा पहिला उपांत्य सामना सिडनी येथे खेळवला गेला. येथे न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर 4 गडी गमावून 152 धावा केल्या. न्यूझीलंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा कर्णधार बाबार आझम आणि सलामीवीर मोहम्मद रिजवान या दोघांनीही अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर 153 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात न्यूझीलंडची सुरुवात खूपच खराब झाली. स्फोटक फिन ऍलन पहिल्याच षटकात अवघ्या चार धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर डेव्हॉन कॉनवे 21 धावांवर बाद झाला आणि ग्लेन फिलिप्सने सहा धावा केल्या. 49 धावांत तीन गडी गमावल्यानंतर किवीज संघ गडगडला होता. यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि डॅरेल मिशेल यांनी 68 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या 117 धावांपर्यंत नेली. केन विल्यमसन 42 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. तर डॅरिल मिशेलने 35 चेंडूत नाबाद 53 धावा केल्या. शेवटी जेम्स नीशमने 12 चेंडूत 16 धावा करत न्यूझीलंडची धावसंख्या 4 बाद 152 पर्यंत नेली.

हे सुद्धा वाचा

Sanjay Raut Bail : आता मी पुन्हा लढेन, कामाला सुरुवात करेन; संजय राऊतांची जामीन मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया!

Bharat Jodo Yatra in Maharashtra : शरद पवार भारत जोडो यात्रेला राहणार गैरहजर

Shetkari Samvad Yatra : शहाजी बापूंच्या मतदार संघात आदित्य ठाकरेंना तुफान प्रतिसाद

या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबार आझम याने 42 चेंडूत 53 तर सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिजवानने 43 चेंडूत 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. याशिवाय फलंदाज मोहम्मद हॅरिसने 26 चेंडूत 30 धावा केल्या. यांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानी संघाने 3 विकेट गमावरत शेवटच्या षटकांत विजय मिळवत फायनलमध्ये धडाकेदार प्रवेश केला आहे.

दरम्यान, टी20 विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना गुरुवारी (10 नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये ओव्हलच्या ऍडिलेड क्रिकेट स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय होणारा संघ रविवारी (13 नोव्हेंबर) पाकिस्तान विरुद्ध अंतिम सामना खेळेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी