32 C
Mumbai
Saturday, December 2, 2023
घरक्रीडाटीम इंडिया Vs न्यूझीलंड; विजयी 'पंच' कुणाचा?

टीम इंडिया Vs न्यूझीलंड; विजयी ‘पंच’ कुणाचा?

आज दुपारी आयसीसी वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष आहे कारण गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंड आणि दुसऱ्या क्रमांकावर टीम इंडिया आहे. दोघांचे गुण आठ आहेत. दोन्ही संघ सलग चारही सामने जिंकलेला आहे. त्यामुळे आता जो संघ हा सामना जिंकेल त्याचे विजयाचे पंचक असेल. दोन्ही संघ तगडे आहेत आणि दोन्ही संघांना विजयाची अपेक्षा आहे. त्यामुळे टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील कोणता संघ हा सामना जिंकणार याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. आजचा सामना हिमालयाच्या कुशीत म्हणजे धरमशाला या सर्वात उंचीवरील स्टेडियममध्ये होणार आहे. शिवाय हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवल्याने सर्वांच्या मनात धाकधूक देखील आहे.

मागच्या सामन्या हार्दिक पांड्या जखमी झाल्यामुळे तो या सामन्यात खेळणार नाही. तरीही टीम इंडियाचा संघ तगडा आहे. तीन वेगवान आणि तीन फिरकी गोलंदाजांचे अस्त्र कर्णधार रोहित शर्माकडे आहेत. शिवाय खुद्द रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल. राहुल असे तगडे फलंदाजदेखील आहेत. त्यामुळे टीम इंडिया निश्चिंत आहे. त्याचवेळी न्यूझीलंडकडे हेन्री, बोल्ट, सँटनर, फर्ग्युसन हे तोडीस तोड गोलंदाज आहेत. शिवाय न्यूझीलंडची टीम गतवेळची उपविजेची टीम आहे, हे विसरून चालणार नाही. त्याचवेळी २००३ पासूनच्या विश्वचषक स्पर्धेपासून टीम इंडियाने एकदाही न्यूझीलंडला हरवलेले नाही. यावरून न्यूझीलंडच्या टीमची ताकद लक्षात येते. म्हणून न्यूझीलंडवर विजय मिळवणे फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाला शक्य असले तर सोपे नक्कीच नाही.

हवामान काय म्हणते?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज वादळीवाऱ्यासह पाऊसाची शक्यता आहे. शिवाय दिवसभर ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. पाऊस आल्यास दोन्ही टीमच्या खेळावर नक्कीच परिणाम होऊ शकतो.

कसे आहे धरमशाला स्टेडियम?

धरमशाला स्टेडियममध्ये आतापर्यंत ७ लढती झाल्या आहेत. त्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ तीनवेळा विजयी झाला आहे. टीम इंडिया आतापर्यंत चार सामने या स्टेडियमवर खेळली आहे. त्यातील दोन सामन्यांत विजय आणि दोन सामन्यांत पराभव झाला आहे. तर न्यूझीलंडची टीम आतापर्यंत एक सामना या मैदानावर खेळली असून तो सामना जिंकला आहे.

हे ही वाचा

‘मराठा-कुणबी’ संदर्भात काय बोलले रामदास कदम?

इस्रायलच्या संरक्षणासाठी अमेरिकेने उचलले मदतीचे पाऊल

ड्रगमाफिया ललित पाटीलच्या ‘बारा’ भानगडी

आज रोहित शर्माची टीम इंडिया आणि टॉम लॅथमचा न्यूझीलंडचा संघ यांच्याच चुरशीची लढत होणार आहे, एवढे नक्की. आणि दोन्ही टीममधील कोणता संघ विजयी पंच मारणार याकडे क्रिक्रेटप्रेमींचे खासकरून भारतीयांचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी