30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeक्रीडासांगलीत रंगणार भारतातील सर्वांत मोठी रूस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीचा थरार

सांगलीत रंगणार भारतातील सर्वांत मोठी रूस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीचा थरार

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहारदादा पाटील युथ फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त येत्या 9 एप्रिल 2023 राेजी भारतातील सर्वांत माेठी रूस्तम -ए – हिंद बैलगाडी शर्यत स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या बक्षिसांचे अनावरण डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हिंदकेसरी पै.संताेष वेताळ, युवा उद्योजक अतुल भिसे, विक्रमसिंह पाटील, केदार भोसले, रेवण सुर्यवंशी उपस्थित हाेते.

या स्पर्धेबाबत माहिती देताना पै.चंद्रहार पाटील म्हणाले, गोवंश संवर्धनासाठी एक उपक्रम आणि बैलगाडी शर्यत जिंकणाऱ्या बैलांच्या मालकांना सन्मानपूर्वक बक्षीस मिळावे यासाठी आम्ही डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहारदादा पाटील युथ फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे 9 एप्रिल 2023 राेजी संपूर्ण भारतातील सर्वांत माेठी बैलगाडी शर्यत आयाेजित केली आहे. आपल्या भागात चालणारी पट्टा पध्दतीची बैलगाडी शर्यत स्पर्धा हाेणार आहे. या शर्यतीत सहभागी हाेणाऱ्या प्रत्येक बैलगाडीच्या 6 जणांनी रक्तदान केल्याशिवाय शर्यतीसाठी बैलगाडीची नाेंदणी केली जाणार नाही. बैलगाडीच्या मैदानात एक नवा वेगळा रक्तदानाचा पायंडा पाडणारे भाळवणीचे मैदान ठरणार आहे. एक सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान सक्ती केलेले आहे. स्पर्धेतील बक्षीस आणि नियाेजन हे पुर्णपणे पारदर्शी असणार आहे. स्पर्धेचे याेग्य नियाेजन केलेले आहे. स्पर्धेसाठी मैदान तयार करण्यात आले आहे.

The thrill of India's biggest Rustam-e-Hind bullock cart race to be held in Sangli

बैलगाडी शर्यतीच्या पट्ट्याच्या बाजूला प्रेक्षकांसाठी खास बैठकव्यवस्था गॅलरीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. बैलगाडी शर्यतीचा थरार माेठ्या स्क्रीनवर पाहता यावी यासाठी 40 बाय 20 आकाराची भव्य एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. या बैलगाडी शर्यतीतील विजेत्या प्रथम क्रमाकांस थार गाडी, चषक आणि 1 किलाे गुलाल, व्दितीय क्रमांकास ट्रॅक्टर, चषक आणि 1 किलाे गुलाल, तिसऱ्या क्रमांकास ट्रॅक्टर, चषक आणि 1 किलाे गुलाल, चाैथ्या क्रमांकास माेटरसायकल व चषक, पाचव्या क्रमांकास माेटरसायकल व चषक, सहाव्या क्रमांकास माेटरसायकल व चषक अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. तसेच गटात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या गाडीला मानाची गदा व 1 किलाे गुलाल दिला जाणार आहे. प्रत्येक रक्तदात्याला टी – शर्ट व टाेपी दिली जाणार आहे. या शर्यतीत सहभागी हाेणाऱ्या प्रत्येक गाडीला चषक दिला जाणार असल्याचे पै. चंद्रहार पाटील यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : 

सांगलीच्या चाहत्यांची कमाल; ‘पठाण’साठी केले अख्खे थिएटर बुक

पुण्यात पार पडलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा अनधिकृत : कुस्तीसम्राट अस्लम काझी

पुण्याचा शिवराज राक्षे झाला ‘महाराष्ट्र केसरी’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी