आशिया कप 19 वर्षांखालील स्पर्धा यूएईमध्ये खेळली जात आहे. भारत आणि पाकिस्तान आज आमने-सामने आले होते. मात्र, या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. भारत आणि पाकिस्तान यांचा पहिला सामना खेळला जात होता. पाकिस्तानने भारताचा 43 धावांनी पराभव केला. (under 19 asia cup 2024 pakistan beats india)
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाबाबत आयसीसीची बैठक संपली
पाकिस्तानकडून शाहजेब खानने अप्रतिम खेळी खेळली. त्याने 147 चेंडूत 159 धावा केल्या होत्या. याशिवाय उस्मान खाननेही 60 धावांचे योगदान दिले. या दोन्ही फलंदाजांच्या जोरावर पाकिस्तानने 181 धावांपर्यंत मजल मारली होती. शाहजेब खानच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने सामना जिंकला. (under 19 asia cup 2024 pakistan beats india)
WPL 2025 मिनी लिलावाची तारीख जाहीर, पहा कधी होणार मुलींवर पैशांचा पाऊस
स्टार फलंदाजांनी टीम इंडियाची निराशा केली. आयुष म्हात्रेने 20 धावा केल्या, तर वैभव सूर्यवंशीनेही निराशा केली. त्याने 9 चेंडू खेळून 1 धाव काढली. या सामन्यातून वैभवकडून खूप अपेक्षा होत्या. अलीकडेच राजस्थानने 1.1 कोटी रुपये खर्च करून वैभवला आपल्या संघाचा भाग बनवले. अशा परिस्थितीत त्याच्याकडून अधिक अपेक्षा होत्या. (under 19 asia cup 2024 pakistan beats india)
बीसीसीआयने आशिया कपचे कर्णधारपद मोहम्मद अमानकडे दिले आहे. पण या सामन्यातही अमनने निराशा केली. तो मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरला. अमनने 43 चेंडूत केवळ 16 धावा केल्या होत्या. भारताकडून निखिल कुमारने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 77 चेंडूत 67 धावांची खेळी खेळली. पाकिस्तानने 50 षटकात 281/7 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघ 47.1 षटकांत 238 धावांवरच मर्यादित राहिला. (under 19 asia cup 2024 pakistan beats india)
पाकिस्तानकडून अली रझाने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने आपल्या नावावर 3 विकेट घेतल्या आणि 9 षटकात 36 धावा दिल्या. त्यांच्याशिवाय अब्दुल सुभान आणि फहम उल हक यांनाही प्रत्येकी 2 यश मिळाले. भारताकडून समर्थ नागराजने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने 10 षटकात 45 धावा देऊन 3 बळी घेतले. त्याच्याशिवाय आयुष म्हात्रेला 2 यश मिळाले. (under 19 asia cup 2024 pakistan beats india)