34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाVinod Kambali : माजी स्टार क्रिकेटर विनोद कांबळी कामाच्या शोधात

Vinod Kambali : माजी स्टार क्रिकेटर विनोद कांबळी कामाच्या शोधात

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने एका वृत्तपत्राला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी विनोद कांबळी याने क्रिकेटशी संबंधित कोणतेही काम करण्याची तयारी दर्शिविली आहे.

भारतात क्वचितच असा एखादा क्रिकेटप्रेमी सापडेल ज्याला क्रिकेट विश्वातील फलंदाज विनोद कांबळी (Vinod Kambli) याचे नाव माहित नसेल. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे क्रिकेट विश्वातील सर्वात सुप्रसिद्ध जोडी होती. क्रिकेट करिअरच्या सुरुवातीसच विनोद कांबळी यांनी आपल्या जोरदार फलंदाजीमुळे प्रेक्षकांच्या मनात घर केले. पण त्याचवेळी सचिन तेंडुलकर याने क्रिकेटमध्ये आपला वेग पकडायला सुरुवात केली. ज्यामुळे सचिन तेंडुलकर क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला. परंतु दुसरीकडे विनोद कांबळी याला त्याच्या बेशिस्तपणामुळे भारतीय संघातून डावलण्यास सुरुवात झाली. पण आता याच माजी स्टार क्रिकेटपटू राहिलेला विनोद कांबळी काम मिळविण्यासाठी विनवणी करत आहे. विनोद कांबळी सध्या आर्थिक अडचणीत सापडला असल्याने त्याने त्याला कोणीतरी क्रिकेट प्रशिक्षकाचे काम द्या, असे म्हंटले आहे.

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने एका वृत्तपत्राला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी विनोद कांबळी याने क्रिकेटशी संबंधित कोणतेही काम करण्याची तयारी दर्शिविली आहे. आजपर्यंत विनोद कांबळी याने छोट्या पडद्यापासून ते चित्रपट या सर्वांमध्येच आपले नशीब आजमावले. पण या कशातच त्याला यश मिळाले नाही. म्हणून गेल्या काही वर्षांपासून विनोद कांबळी हे सर्व गोष्टींपासुनच स्वतःला लांब ठेऊ लागले. तर विनोद कांबळी कायमच आपल्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडायचा.

हे सुद्धा वाचा

Nitin Gadkari : भाजपकडून नितीन गडकरींना दुजाभाव?

Azadi ka Amrit Mahotsav:’आजादी का अमृत महोत्सव’ : पतंगबाजीमुळे शेकडो पक्षी घायाळ

Youth Initiative : राज्यात निघणार स्टार्टअप, इनोव्हेशन यात्रा, शिंदे सरकारचा उपक्रम

दरम्यान, आता विनोद कांबळी याने दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याला त्याचे कुटुंब चालविण्यासाठी कामाची नितांत गरज असल्याचे सांगितले आहे. क्रिकेटशी संबंधित कोणतेही काम असले तरी ते काम विनोद करण्यास तयार आहे. पण त्याला फक्त आता तरुण पिढीला क्रिकेट शिकवायचे आहे, त्यांना मार्गदर्शन करावयाचे असल्याचे त्याने मुलाखतीती म्हंटले आहे.

या मुलाखतीमध्ये त्याने बीसीसीआयचे आभार सुद्धा मानले आहे. कारण सध्या निवृत्त क्रिकेटपटू म्हणून विनोद कांबळी याला बीसीसीआयकडून ३० हजार रुपये पेंशन देण्यात येत आहे. ज्या मानधनावर विनोद कांबळी याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु आहे. असेही विनोद कांबळी याने या मुलाखतीमध्ये सांगितले. इतकेच नाही तर क्रिकेट या खेळाने मला खूप काही दिले आहे. त्यामुळे मी क्रिकेट संबंधित कोणतीही नोकरी करण्यास तयार असल्याची भावना यावेळी विनोद कांबळी याने व्यक्त केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी