पाकिस्तान क्रिकेट संघाला नुकताच मोठा धक्का बसला आहे. बाबर आझमने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर सर्वीकडे याच विषयवार चर्चा होत आहे. भारत आणि पाकिस्तान कट्टर विरोधी आहे. त्यामुळे भारताचा विराट कोहली आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांची चाहते तुलना करत असतात. (virat kohli and babar azam who is better mudassar nazar)
मात्र, आता माजी दिग्गज पाकिस्तानी खेळाडू मुदस्सर नाझरने या विषयावर आपले मत उघडपणे मांडले आहे. त्याने सांगितले आहे की दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? (virat kohli and babar azam who is better mudassar nazar)
बाबर आझमने पाकिस्तानचे कर्णधारपद का सोडले? खरे कारण आले समोर
मुदस्सर नजर यांच्या म्हणण्यानुसार बाबर आझमला अजून बरेच रेकॉर्ड आपल्या नावी करायचे आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये खूप फरक आहे. विराटला नेहमीच महान खेळाडूंपैकी एक म्हणून स्मरणात ठेवले जाईल, तर बाबरने अद्याप स्वतःचे नाव कमावले नाही. (virat kohli and babar azam who is better mudassar nazar)
याशिवाय मुदस्सर नजरने सांगितले की, त्याला रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा खेळ खूप आवडतो. विशेषत: जेव्हा तो लयीत असतो तेव्हा त्याचा खेळ आणखीनच प्रेक्षणीय होतो. तुम्ही त्यांना तासन् तास टीव्हीवर बसून पाहू शकता. (virat kohli and babar azam who is better mudassar nazar)
IND vs BAN: टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव करून दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकली
याशिवाय मुदस्सर नजरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या व्यवस्थापनावरही निशाणा साधला आहे. त्यांनी कर्णधाराकडे जास्त लक्ष देऊ नये, असा सल्ला त्यांनी बोर्डाला दिला. आम्ही सेटअपमध्ये गोंधळ करू नये.
अलीकडेच शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला बांगलादेशविरुद्धची मालिका घरच्या भूमीवर गमवावी लागली होती. पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पहिला सामना 7 ऑक्टोबरला तर शेवटचा सामना 24 ऑक्टोबरला होणार आहे. (virat kohli and babar azam who is better mudassar nazar)
इंग्लंडविरुद्ध पाकिस्तान संघ
शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमेर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, मीर हमजा, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नसीम शाह, नोमान अली, सैम अय्युब, सलमान अली आगा , सरफराज अहमद (यष्टीरक्षक), शाहीन शाह आफ्रिदी.