29 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरक्रीडाVirat Kohli Birthday Special : फॉर्म इज टेम्पररी, 'विराट' इज पर्मनंट

Virat Kohli Birthday Special : फॉर्म इज टेम्पररी, ‘विराट’ इज पर्मनंट

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू विराट कोहली आज (5 नोव्हेंबर 2022) त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. विराटने आजवर क्रिकेट जगतात अनेक विक्रम मोडित काढले. अनेक नवे विक्रम रचले. मात्र या कोहलीचा विराट बनण्याचा प्रवास सोपा नव्हता.

17 डिसेंबर 2006 चा दिवस भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या रणजी चषकाचा सामना दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर सुरू होता. या सामन्यांत दिल्ली आणि भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये जाएंट असा ओळख असणारा कर्नाटक हे दोन संघ आमने सामने होते. पहिल्याच इनिंग मध्ये कर्नाटकने आपल्या नावाला साजेशी कामगिरी करत 446 रन्स काढले. समोर असणारी दिल्लीची टीम कणखर हेती. पण यावेळी मात्र, दिल्लीली चांगलाच दणका बसला. सुरुवातीलाच आकाश चोपडा (0) शिखर धवन (8) मयांक तेलांग (0) आणि कर्णधार मिथून मन्हाश (0) हो चार खेळाडू एकापाठोपाठ एक बाद झाले. त्यावेळी मात्र, संपूर्ण स्पर्धेत फॉर्मसाठी चाचपडणारा एक पठ्ठ्या वेगळ्याच धुंदीत होता. आपली चौथी फर्स्ट क्लास मॅच खेळणाऱ्या 18 वर्षांच्या या पठ्ठ्याने पुनित बिष्टच्या मदतीने डाव सावरला. आणि दिवसअखेर नाबाद 40 धावा केल्या. आपल्या टीमला फॉलोऑन पासून वाचवायचं आणि कितीही काहीही झालं तरी शतक झळकवायचे इतकाच विचटार मनात घेऊन पठ्ठ्या लढत राहिला.

मैदानातला तो दिवस निभावून नेल्यानंतर पठ्ठ्या घरी आला. त्याचे वडील पॅरेलॅसिसच्या आजाराने त्रस्त होते. त्याच रात्री अचानक त्याच्या वडिलांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि उपचार करण्याआधीच त्यांना देवाज्ञा झाली. सकाळी वडिलांच्या अंत्यसंस्काराची वेळ झाली. त्यांचे पार्थिव शरीर घरात होतं आणि पठ्ठ्या मैदानात जायला निघाला. त्याला घेण्यासाठी नेहमीप्रमाणे इशांत शर्मा त्याच्या घराजवळ पोहोचला. गाडीत बसल्यानंतर पठ्ठ्याच्या तोंडातून एकच वाक्य निघालं “पापा नही रहे!” रडवेल्या अवस्थेत पठ्ठ्या मैदानात पोहोचला. तो एका कोपऱ्यात शांत बसला होता. कर्णधार मिथून त्याच्या जवळ आला अन् त्याला म्हणाला, घर जा! त्यावेळई पठ्ठ्या म्हणाला, मै खेलूंगा! त्यादिवशी पठ्ठ्या पुन्हा मैदानात उतरला अन् कर्नाटकच्या गोलंदाजांनी घाम फोडत 90 धावा केल्या. शतकासाठी अवघ्या 10 धावा बाकी असताना तो बाद झाला. त्याने आपल्या प्रशिक्षकांना फोन केला अन् सांगितलं, मुझे गलत आऊट दिया, सिर्फ 10 रन्स चाहिये थे! वडिलांच्या मृत्यूचं दुःख मनात भरलेलं होतंच पण त्यापेक्षाही जास्त शतक पूर्ण न झाल्याचे सल त्याला बोचत होती. त्याचे वडिल नेहमी म्हणायचे, मेरा लडका एक दिन इंडिया के लिए खेलेगा और बहोत बडा खिलाडी बनेगा! पठ्ठ्यानं वडिलांचं स्वप्न साकार केलं अन् क्रिकेट जगातला सर्वात मोठा खेळाडू बनला. त्या पठ्ठ्याचं नाव म्हणजे विराट कोहली.

हे सुद्धा वाचा

First Indian Voter Death : भारताच्या पहिल्या मतदाराचे झाले निधन

Mumbai News : मुंबई हायकोर्टाचे नाव आता महाराष्ट्र हायकोर्ट? वाचा काय म्हणाले सुप्रीम कोर्ट

Mumbai News : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई ! मुलींची तस्करी करणारी टोळी गजाआड

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू विराट कोहली आज (5 नोव्हेंबर 2022) त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. विराटने आजवर क्रिकेट जगतात अनेक विक्रम मोडित काढले. अनेक नवे विक्रम रचले. मात्र या कोहलीचा विराट बनण्याचा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात संघात स्थान प्राप्त करण्यासाठी आलेल्या अडचणी. खेळाडू म्हणून आणि कर्णधार म्हणून मैदानातील अधिकची आक्रमकता, खेळाडूंना केलेल्या स्लेजिंगमुळे मिळालेली नाराजी. स्टेंडियामवरील प्रेक्षकांना केलेले अश्लिल हातवारे, मध्यंतरीच्या काळात गंडलेला फॉर्म अन् स्वतःच्या मुलीचे व्हायरल झालेल्या फोटोवरून उद्भवलेला वाद या सर्व गोष्टींमुळे कोहली संपलाय असं म्हणणारे अनेक जण तयार झाले होते. अनेक वर्ष आयपीएलमध्ये बंगळूरूच्या संघाचे नेतृत्व करताना आलेलं अपयश आणि दरवर्षी तिच ती ‘इ साला कप नमदे’ची घोषणा यावरूबनही कोहलीला अनेकदा ट्रोल केलं गेलं. पण जितकी त्याचा आक्रमक स्वभाव तितकाच तो मनाने हळवा. याचंच उदाहरण घ्यायचं तर दुखापतीतून सावरलेल्या शाहीन आफ्रिदीची घेतलेली भेट, फिक्सिंग मध्ये सापडलेल्या मोहम्मद आमीरला पुनरागमनावेळी गिफ्ट दिलेली बॅट, क्रिकेट नियमांचं उल्लंघट केल्यानंतर ट्रोल होणाऱ्या स्टीव्ह स्मीथसाठी प्रेक्षकांना टाळ्या वाजवायला सांगण्याचं मोठं मनं आणि रिषभ पंत कडून स्टंम्पिंग मिस झाल्यानंतर प्रेक्षकांचा धोनीच्या नावाने घुमणाऱ्या घोषणांमध्ये पंतला दिलेलं प्रोत्साहन या सगळ्या गोष्टींमध्ये कोहलीचं विराट मनं पाहायला मिळत.

एक गोष्ट आहे, आजवर क्रिकेटमध्ये अनेक सुपरस्टार आले. फक्त भारतीय क्रिकेट बद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीला कपिल देव, त्यानंतर सौरव गांगुली, राहुल द्रविड, सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवान, अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी या प्रत्येकाने नाव कमावले. क्रिकेट चाहत्यांच्या मनावर अभिराज्य गाजवंल पण एक गोष्टजी या कोणालाही जमली नाही ती विराट कोहलीने त्यार करून दाखवली. ती म्हणजे एतकी सगळी आव्हाने समोर असताना. क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या खेळपट्टीवर अनेक वाईट प्रसंग आले असताना स्वतःला आणि संघाला सावरकण्याची जिद्द दाखवणारा मोठ्या मनाचा खेळाडू ना विराट आधी कोणी होता, ना यापुढे होईल. म्हणूनच तर आम्ही बोलतोय ना, फॉर्म इज टेम्पररी; विराट इज पर्मनंट!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी