भारत आणि बांगलादेशमध्ये दुसरा कसोटी सामना 27 सेप्टेंबरला खेळला जाणार आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय टीमचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली ग्रीन पार्कवर अनेक विक्रम रचू शकतो. विराट कोहली 129 धावा करून नऊ हजार धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या क्लबमध्ये सामील होईल. तर, विराट 1000 चौकार मारण्यापासून सात पावले दूर आहे. (virat kohli can complete 9000 test runs in kanpur)
बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर
ग्रीन पार्कमध्ये विराट 5 वेळा खेळला आहे
किंग कोहली याआधी पाच वेळा ग्रीन पार्कमध्ये खेळला आहे. विराटने आतापर्यंत खेळलेल्या 114 कसोटी सामन्यांमध्ये 8871 धावा केल्या आहेत. 129 धावा करताच तो नऊ हजार धावा करणारा खेळाडू बनेल. तो महान इंग्लिश क्रिकेटपटू ग्रॅहम गूचच्या 8900 धावांपेक्षा फक्त 129 धावांनी मागे आहे. याशिवाय तो एक हजार चौकार ठोकण्यापासून फक्त सात पावले दूर आहे, त्याने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत 993 चौकार मारले आहेत. (virat kohli can complete 9000 test runs in kanpur)
अपघातानंतर असा होता ऋषभ पंतचा रुटीन, या गोष्टींचे केले सेवन
ग्रीन पार्क येथे होणारा कसोटी सामना अनेक अर्थाने रेकॉर्डब्रेकर ठरणार आहे. चेन्नईत खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत विराटच्या फ्लॉप शोनंतर आता दुसऱ्या कसोटीतही क्रिकेटप्रेमींना त्याच्या शानदार खेळीची अपेक्षा असेल. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 17 खेळाडू नऊ हजार धावांच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. (virat kohli can complete 9000 test runs in kanpur)
सचिन आणि राहुलच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याची संधी
ग्रीन पार्कमध्ये खेळणारा विराट जगातील 18 वा खेळाडू बनू शकतो. भारतातून सचिन, राहुल आणि सुनील गावस्कर या क्लबमध्ये सामील झाले आहेत. त्याचबरोबर 1000 चौकारांबद्दल बोलायचे झाले तर, या क्लबमध्ये विराटच्या आधी सचिन, राहुल, सेहवाग आणि लक्ष्मण यांनी हा पराक्रम केला आहे. (virat kohli can complete 9000 test runs in kanpur)