भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. मालिकेतील तीन सामने खेळले गेले आहेत. चौथा सामना मेलबर्नमध्ये होणार आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली या बॉक्सिंग डे टेस्टसाठी मेलबर्नला पोहोचला आहे. यादरम्यान मेलबर्न विमानतळावर विराट कोहलीची ऑस्ट्रेलियन मीडियाशी बाचा-बाची झाली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (virat kohli clashed with media at melbourne airport)
ICC ने पाकिस्तानला दिले आणखी एका स्पर्धेचे यजमानपद, जाणून घ्या कारण
बॉक्सिंग डे टेस्टसाठी विराट कोहलीने मेलबर्न विमानतळावर मीडियासमोर आपली नाराजी व्यक्त केली. कोहली आणि एका टीव्ही पत्रकारामध्ये किरकोळ बाचाबाची झाली. कोहली सुरुवातीला काहीही न बोलता तिथून निघून गेला, पण नंतर तो परत आला आणि काहीतरी वेगळेच बोलला. मीडियाचे कॅमेरे आपल्या कुटुंबावर फोकस करत असल्याने तो नाराज होता. यावरून हे स्पष्ट झाले की कोहली सध्या मीडियाच्या जास्त लाइमलाइटमुळे थोडा अस्वस्थ आहे. (virat kohli clashed with media at melbourne airport)
रविचंद्रन अश्विनआधी ‘या’ खेळाडूंनी केली होती मालिकेच्या मध्यात निवृत्तीची घोषणा
विराट कोहली अलीकडे त्याच्या खराब फलंदाजीच्या फॉर्मशी झुंजत आहे. पर्थमधील पहिल्या कसोटी सामन्यात त्याने शतक झळकावले, पण त्यानंतर त्याच्या पुढच्या चार डावात त्याने एकूण 26 धावा केल्या. कोहलीसाठी हा काळ आव्हानात्मक होता आणि त्यामुळे त्याच्या आत्मविश्वासावरही परिणाम झाला आहे. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे, कारण ब्रिस्बेनमधील गाबा येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीचा निकाल अनिर्णित राहिला. आता कोहलीवर पुढील सामन्यात कामगिरी सुधारण्याचे दडपण असेल. (virat kohli clashed with media at melbourne airport)
दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्मा आपल्या खराब फॉर्ममुळे चिंतेत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर त्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, तो चांगला खेळला नाही हे चुकीचे नाही, पण त्याची तयारी योग्य आहे आणि तो लवकरच फॉर्ममध्ये येईल हे त्याला माहीत आहे. क्रीजवर जास्त वेळ घालवूनच तो आपला फॉर्म सुधारू शकतो, असा रोहितचा विश्वास आहे. (virat kohli clashed with media at melbourne airport)