31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeक्रीडा'विराट कोहलीने भेट दिलेल्या बॅटने मी कधीही खेळणार नाही’: आकाशदीप

‘विराट कोहलीने भेट दिलेल्या बॅटने मी कधीही खेळणार नाही’: आकाशदीप

भारताचा स्टार गोलंदाज आकाशदीपने एक मोठी बातमी दिली आहे. त्याने अशी गोष्ट सांगितली ज्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. (virat kohli gifted bat to akash deep)

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना भारतने जिंकला असून याचा दुसरा सामना 27 सप्टेंबरला कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा स्टार गोलंदाज आकाशदीपने एक मोठी बातमी दिली आहे. त्याने अशी गोष्ट सांगितली ज्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. (virat kohli gifted bat to akash deep)

बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर

आकाशदीपने सांगितले की चेन्नईतील हॉटेलमध्ये असताना अचानक त्याला दरवाजा ठोठावल्याचा आवाज आला. त्याने पाहिलं की विराट कोहली त्याच्या रूमच्या बाहेर उभा आहे. त्यानंतर कोहली त्याच्या खोलीत आला आणि यावेळी त्याच्या हातात एक नवीन बॅट होती. (virat kohli gifted bat to akash deep)

कोहलीने आकाशदीपला विचारले, तुला बॅट हवी आहे का? यादरम्यान त्याला धक्का बसला आणि त्याने विराटकडून बॅट हिसकावून घेतली. कोहलीने आकाशदीपला ही बॅट ठेवण्यास सांगितले. आकाशदीपने लगेचच किंग कोहलीला बॅटवर ऑटोग्राफ घेण्याची विनंती केली आणि त्याला मिठी मारली. (virat kohli gifted bat to akash deep)

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आकाश दीपने एका मुलाखतीत सांगितले की, भारतीय संघाचा स्टार विराट कोहलीने भेट दिलेल्या बॅटने तो कधीही खेळणार नाही. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कोहलीचे आभार मानले आणि ही बॅट अनमोल असल्याचे सांगितले. (virat kohli gifted bat to akash deep)

आकाशने सांगितले की, त्याने ही बॅट कोहलीला मागितली नव्हती, तर कोहलीने त्याला स्वतःच्या इच्छेने ही बॅट भेट दिली होती. या वेगवान गोलंदाजाने सांगितले की, भारताचा माजी कर्णधार त्याच्या फलंदाजीने प्रभावित झाला असावा आणि त्याने कधीही त्याचा वापर न करण्याची आणि ती नेहमी संस्मरणीय बनवण्याची शपथ घेतली असेल. (virat kohli gifted bat to akash deep)

कानपूरमध्ये इतिहास रचणार विराट कोहली! सचिन तेंडुलकरच्या क्लबमध्ये होणार सामील

आकाशदीप पुढे म्हणाला की, विराट भाऊने स्वतः बॅट दिली होती. त्याला माझ्या फलंदाजीत काहीतरी दिसले असेल. मी ते विचारले नाही म्हणून तो माझ्याकडे आला आणि विचारले, ‘तुला बॅट हवी आहे का?’ विराट भाऊकडून बॅट कोणाला नको असेल? तो एक लिजेंड आहे. त्याचे शब्द ऐकून मला खूप आनंद झाला आणि मला ती बॅट हवी होती. (virat kohli gifted bat to akash deep)

त्याने मला विचारले की मी फलंदाजी करताना कोणत्या प्रकारची बॅट वापरतो, आणि मी फक्त हसलो, कारण मला शब्दांची कमतरता होती. मग तो म्हणाला हे घे, ही बॅट ठेव. मी त्या बॅटने कधीच खेळणार नाही. विराट भाऊकडून ही एक उत्तम भेट आहे आणि मी ती माझ्या खोलीच्या भिंतीवर स्मृतीचिन्ह म्हणून ठेवणार आहे. मी बॅटवर त्याचा ऑटोग्राफही घेतला. (virat kohli gifted bat to akash deep)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी