34 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरक्रीडाVirat Kohli : टी20 विश्वचषकात कोहलीचा आणखी एक 'विराट' विक्रम!

Virat Kohli : टी20 विश्वचषकात कोहलीचा आणखी एक ‘विराट’ विक्रम!

2022 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली जबरदस्त लयीत दिसला आहे. यावर्षी खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषकात त्याने एक नवा विक्रम केला आहे. कोहली T20 च्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

2022 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली जबरदस्त लयीत दिसला आहे. यावर्षी खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषकात त्याने एक नवा विक्रम केला आहे. कोहली T20 च्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. हे वृत्त लिहिपर्यंत विराटने एकूण 1065 धावा केल्या आहेत. यापूर्वी, श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धने 1016 धावांसह T20 विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्या क्रमांकावर होता. विराटने अवघ्या 23 डावात हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तर महेला जयवर्धनेने 1016 धावा करण्यासाठी 31 डाव घेतले. महेला जयवर्धनेची सरासरी 39.07 त्याचबरोबर विराट कोहलीने 85 पेक्षा जास्त सरासरीने या धावांचा आकडा गाठला आहे.

या यादीत रोहित शर्माचाही समावेश आहे
या यादीत रोहित शर्माही ९२१ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल 965 धावांसह रोहित शर्मापेक्षा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने टी-20 विश्वचषकात आतापर्यंत एकूण 34 डाव खेळले आहेत, तर ख्रिस गेलने एकूण 31 डावांमध्ये या धावा केल्या आहेत. त्याचबरोबर श्रीलंकेचा माजी फलंदाज तिलकरत्ने दिलशान या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. दिलशानने 34 डावात 897 धावा केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

Sanjay Raut : पत्राचाळ प्रकरणात कोर्टाची ‘तारीख पे तारीख’ सुरूच! संजय राऊतांची कोठडी वाढली

Morbi Bridge Collapse : ‘देवाची करणी’ ! मोरबे पूल प्रकरणात ओरवे कंपनीच्या व्यवस्थापकाचा अजब दावा

Nitin Raut : पोलिसांची दंडेली! माजी मंत्री नितीन राऊत यांना मोठी दुखापत

चांगला T20 विश्वचषक 2022
विराट कोहलीने 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्याने नाबाद 82 धावांची खेळी केली होती. यानंतर नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात विराटच्या बॅटमधून 62* धावांची इनिंग आली. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याची बॅट काहीशी शांत दिसली. आफ्रिकेविरुद्ध 12 धावा करून विराट पॅव्हेलियनमध्ये परतला.

दरम्यान, विराट सध्या सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात केवळ एका सामन्यात बाध झाला होता. त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाला पराभवाचे तोंड पहावे लागले होते. शिवाय टी20 विश्वचषकात विराटने चार सामन्यांपैकी तीन सामन्यांत अर्धशतकाचा आकडा पार केला आहे. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाला आणि चाहत्यांना उर्वरित महत्त्वाच्या सामन्यांत चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!