29 C
Mumbai
Saturday, December 3, 2022
घरक्रीडाCricket : जेव्हा विराट अन् सुर्या क्रिकेटच्या मैदानात भिडले

Cricket : जेव्हा विराट अन् सुर्या क्रिकेटच्या मैदानात भिडले

आयपीएल मध्ये त्याच्या विरोधात उभा असणारा विराट आता त्याच्या पाठी भक्क्मपणे उभा आहे. आणि अंगावर असलेल्या जर्सीवर मुंबई इंडियंन्सच्या जागेवर भारताचे नाव लिहिले आहे.

ऑक्टोबरचा महिना 2020 साल आयपीएलचा हंगाम रंगात होता. 28 तारखेचा सामान होता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियंन्स, आता बंगलोर म्हंटलं की कोहली अन् मुंबई म्हंटल की रोहित ही दोन प्रमुख नावं समोर येतात. कोहलीच्या संघाची पहिली फलंदाजी होती. देवदत्त पड्डीकल फॉर्मात होता. त्याने मारलेल्या 79 धावांच्या जोरावर बंगलोरने मुंबईसमोर 165 धावांचं लक्ष्य ठेवलं. त्याचा पाठलाग करायला आलेल्या मुंबईची सुरुवात काय खास झाली नाही, त्यात रोहिकत शर्मा संघात नव्हता, त्याच्या जागी पोलार्ड कर्णधार होता. बंगलोरच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांवर दबदबा निर्माण केला होता. डिकॉक, इशान किशन, पंड्या ब्रदर्स सगळे एकामागोमाग एक फेल होत होते. मात्र, अशा स्थितीत सुद्धा एक पठ्ठ्या मैदानात तळ ठोकून बसला होता. त्याने एक बूाजू लढवत 43 चेंडूत 79 धावा केल्यया अन् मुंबईला विजय मिळवून दिला.

एवढा मोठा स्कोरकार्ड सांगून काही फायदाच नाही कारण ही मॅच लक्षात राहिली ती दुसऱ्या डावाच्या 19व्या षटकादरम्यान झालेल्या राड्यामुळे. कव्हर्सच्या ठिकाणी बंगलोरचा कर्मधार विराट कोहली फिल्डींग करत होता. मुंबईचा पठ्ठ्या गपगुमानं फलंदाजी करत होता. आता आपला विराट कोहली काय साधा माणूस नाय. स्लेजिंग हा त्याचा फलंदाजी नंतरचा सर्वात आवडता विषय, भल्या भल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना स्लेज करणाऱ्या विराटने वातावरण तापवायला सुरुवात केली. ही बाचाबाची एवढी मोठी झाली की विराट कोहली थेट फलंदाजावर धावून गेला.

त्यावेळी मुंबईचा तो पठ्ठ्या होता भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पणाची वाट बघणारा अनकॅप्ड सुर्यकुमार यादव. वातावरण तापलं आणि क्षणांत शांत झालं. पण सुर्याने सामन्याच्या शेवटच्या षटकांत मुंबईला विजय मिळवून दिल्यानंतर खतरनाक सेलिब्रेशन केलं. मुंबईने तो सामना एकट्या सुर्याच्या फलंदाजीच्या जोरावर जिंकला. आता तोच सुर्या अस्ंच काहीसं सेलिब्रेशन करतोय, तशाच निळ्या जर्सीत गोलंदाजांनी घाम फोडतोय आणि विरोधी संघातील खेळाडूंच्या स्लेजिंगला आपल्या फटक्यांनी उत्तर देतोय.

या सर्वात फरक इतकाच आहे की, आधीच्या किस्स्यांत त्याच्या विरोधात असणारा विराट आता त्याच्या पाठी भक्क्मपणे उभा आहे. आणि अंगावर असलेल्या जर्सीवर मुंबई इंडियंन्सच्या जागेवर भारताचे नाव लिहिले आहे. यंदाच्या हंगामात विराट नंतर भारतासाठी सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू सुर्यकुमार ठरला आहे. पण त्याच्या धावांपेक्षा त्याच्या स्ट्राईक रेटची दहशद सध्या सगळ्या संघांमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. आता हीच सुर्या अन् विराटची जोडी उरलेल्या सेमी आणि फायनलमध्ये अशीच चमकावी आणि त्यांनी भारताच्या टी20 विश्वचषकाचे 15 वर्षांपासून रखडलेलं स्वप्न पूर्ण करतील हीच अपेक्षा आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!