22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
Homeक्रीडादक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये झाला मोठा बदल 

दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये झाला मोठा बदल 

आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताचा ताण वाढवला आहे. (WTC points table south Africa reaches second place)

श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना जिंकून आश्चर्यकारक कामगिरी केली. आता आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलवर झेप घेतली आहे. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताचा ताण वाढवला आहे. (WTC points table south Africa reaches second place)

अंडर 19 आशिया कप: पाकिस्तानने केला भारताचा पराभव, 43 धावांनी जिंकला सामना

दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 233 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. यासह दक्षिण आफ्रिकेने आश्चर्यकारक कामगिरी केली. आफ्रिकेने आता WTC गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. आफ्रिका आता भारतापेक्षा फक्त 3 PCT गुणांनी मागे आहे. आता दक्षिण आफ्रिकेनेही डब्ल्यूटीसी फायनलमध्ये आपला दावा केला आहे. (WTC points table south Africa reaches second place)

आफ्रिकेने चमकदार कामगिरी करत गुणतालिकेत आपला झेंडा रोवला. सध्या आफ्रिका गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघाने 15 सामन्यात 9 विजय मिळवून पहिले स्थान पटकावले आहे. भारताचे सध्या 61.11 गुण आहेत. तर आफ्रिकेकडे 59.26 पीसीटी गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. (WTC points table south Africa reaches second place)

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाबाबत आयसीसीची बैठक संपली

ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत, त्यात 8 विजय आणि 4 पराभव आहेत आणि त्याचा PCT पॉइंट 57.69 आहे.

2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 233 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. यजमान आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 191/10 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव केवळ 42 धावांवर रोखला गेला. (WTC points table south Africa reaches second place)

आफ्रिकेने दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन केले आणि 366/5 धावा करून डाव घोषित केला. दुसऱ्या डावात ट्रिस्टन स्टब्सने 122 धावा आणि कर्णधार टेंबा बावुमाने 122 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला 282/10 धावाच करता आल्या. पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभवाची चव चाखावी लागली होती. (WTC points table south Africa reaches second place)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी