भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला गेला. या पहिल्या कसोटीत भारताचा आठ गडी राखून पराभव झाला. या पराभवामुळे भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ 74.24 च्या विजयाच्या टक्केवारीसह अव्वल होता. परंतु आता या पराभवनंतर भारतीय संघाची विजयाची टक्केवारी 68.06 वर आली आहे. मात्र, अजूनही भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. या यादीत दुसरा स्थानावर ऑस्ट्रेलिया 62.50 विजयाच्या टक्केवारीसह आहे. (wtc points table update india defeat in bengaluru against nz)
IND vs NZ: बंगळुरू कसोटीतील पराभवानंतर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य
भारत आणि ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंका संघ यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याची विजयाची टक्केवारी 55.56 आहे. बेंगळुरूमध्ये भारताचा पराभव करून न्यूझीलंडला मोठा फायदा झाला आहे. किवी संघ आता थेट चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, इंग्लंड संघ आता पाचव्या स्थानावर घसरला आहे, जो आधी चौथ्या स्थानावर होता. (wtc points table update india defeat in bengaluru against nz)
IND vs NZ: रोहित शर्माने दिले ऋषभ पंतच्या दुखापतीचे मोठे अपडेट
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाकिस्तान आठव्या स्थानावर आहे. हा संघ फक्त वेस्ट इंडिजच्या पुढे आहे, ज्याची विजयाची टक्केवारी 18.52 आहे. पाकिस्तानच्या वर बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका संघ आहेत, ज्यांची विजयाची टक्केवारी अनुक्रमे 34.38 आणि 38.89 आहे. (wtc points table update india defeat in bengaluru against nz)
भारत आणि ऑस्ट्रेलियाचा अव्वल दोन संघांमध्ये समावेश झाल्यानंतरही अंतिम फेरीतील दोन संघ अद्याप निश्चित झालेले नाहीत. संघांमधील लढती जसजशी वाढत आहेत, तसतशी अंतिम फेरीची शर्यत अधिक रोमांचक होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाशिवाय श्रीलंका, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघही अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी दावेदार आहेत. (wtc points table update india defeat in bengaluru against nz)