भारतीय संघाचा युवा फलंदाज अभिषेक शर्माने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वेगवान सुरुवात केली. अभिषेक जवळपास दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच ॲक्शनमध्ये दिसला. मात्र, चांगली कामगिरी करत असताना सहकारी सलामीवीर संजू सॅमसनसोबत झालेल्या गैरसमजामुळे तो धावबाद झाला. त्यामुळे तो त्याच्या बॅटने अजून कमाल नाही दाखवू शकला. त्याने सात चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकारासह 16 धावा केल्या. त्याच्या या खेळीनंतर आता त्याचा गुरु युवराज सिंगने त्याला सल्ला दिला आहे. (yuvraj singh message on abhishek sharma)
2027 मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत खेळणार रोहित शर्मा? बालपणीच्या प्रशिक्षकाने दिले उत्तर
बांगलादेशचा पराभव केल्यानंतर अभिषेकने एक फोटो शेअर केला होता. यावर त्याच्या एका चाहत्याने सांगितले की, लवकरच मोठी इनिंग येणार आहे. यावर युवराज म्हणाला, ‘ते तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूचा योग्य प्रकारे वापर करणार’. यावर्षी IPL 2024 च्या शानदार सत्रानंतर, अभिषेकने झिम्बाब्वे विरुद्धच्या T-20 मालिकेत 47 चेंडूत 100 धावा करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाका केला. त्याने आपल्या शतकाचे श्रेय युवराजला दिले. (yuvraj singh message on abhishek sharma)
हार्दिक पांड्याने मोडला विराट कोहलीचा ‘हा’ विक्रम
Feel For Abhishek Sharma!🥹 pic.twitter.com/9pY9g0lxPS
— RVCJ Media (@RVCJ_FB) October 6, 2024
त्यानंतर अभिषेकने युवराजसोबत झालेला बोलण्याबाबत सांगितले. तो म्हणाला होता, ‘मी त्यांच्याशी बोललो आणि म्हणाले, मला माहिती नाही का पण जेव्हा मी शून्यावर आऊट झालो तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. ही चांगली सुरुवात असल्याचे ते म्हणाले. माझ्या कुटुंबाप्रमाणेच त्यांना माझा अभिमान वाटला पाहिजे असे मला वाटते. त्याच्यामुळेच मी या स्तरावर खेळत आहे. त्यांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्यांनी माझ्या क्रिकेटवरच नव्हे तर मैदानाबाहेरही खूप मेहनत घेतली आहे. (yuvraj singh message on abhishek sharma)
24 वर्षीय अभिषेकने आतापर्यंत सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. येथे त्याने 179.49 च्या स्ट्राइक रेट आणि 28 च्या सरासरीने 140 धावा केल्या आहेत. या युवा फलंदाजाची चमक आयपीएलमध्ये स्पष्टपणे दिसून येते, जिथे त्याने 63 सामन्यांमध्ये 25.48 च्या सरासरीने 1376 धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून सात अर्धशतके निघाली.(yuvraj singh message on abhishek sharma)