24 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeक्रीडायुजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

चहलने इन्स्टाग्रामवर धनश्रीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्याने एक सुंदर कॅप्शनही लिहिले आहे. (yuzvendra chahal shares birthday wish for dhanashree verma)

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी युझवेंद्र चहलने आपल्या पत्नीला खूप वेगळ्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. चहलने इन्स्टाग्रामवर धनश्रीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्याने एक सुंदर कॅप्शनही लिहिले आहे. (yuzvendra chahal shares birthday wish for dhanashree verma)

बांगलादेशला बसला मोठा धक्का, शाकिब अल हसनने केली निवृत्तीची घोषणा

युझवेंद्र चहलने इन्स्टाग्रामवर धनश्रीसोबतचे 10 फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, “आणखी एक वर्ष मोठे, दुसरे वर्ष अधिक अद्भुत! वाढदिवसाच्या शुभेच्छा.” यासोबतच त्याने लव्ह इमोजीचा वापर केला आहे आणि केक इमोजी देखील जोडल्या आहेत. दोघांची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. (yuzvendra chahal shares birthday wish for dhanashree verma)

IND vs BAN: दुसऱ्या कसोटीच्या आधी टीम इंडियाला बसला मोठा धक्का, अचानक खेळाडू परतले

धनश्री वर्माबाबत सांगायचे तर, चहलच्या पत्नीने मुंबईच्या डीवाय पाटील कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. प्रोफेशनल करिअरबद्दल बोलायचे झाले तर ती डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. कोरोनादरम्यान चहलने धनश्रीशी नृत्य शिकण्यासाठी संपर्क साधला होता.  (yuzvendra chahal shares birthday wish for dhanashree verma)

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23)

रणवीर अल्लाबदियाच्या यूट्यूब चॅनलवर धनश्रीने आपल्या प्रेमकथेबद्दल बोलताना सांगितले होते की, जेव्हा तिला पहिल्यांदा चहलचा मेसेज इन्स्टाग्रामवर आला तेव्हा तिला चहल कोण आहे हे माहित नव्हते.(yuzvendra chahal shares birthday wish for dhanashree verma)

धनश्री म्हणाली होती, “जेव्हा मी क्रिकेट पाहणे बंद केले, तेव्हाच त्याने भारतासाठी पदार्पण केले. जेव्हा त्याने डान्स क्लासबद्दल संदेश दिला तेव्हा युजी चहल कोण आहे याची मला कल्पना नव्हती. तो डान्स शिकत होता आणि त्याचा तो गृहपाठही करत होता. त्याला माझ्याशी लग्न करायचे होते. यानंतर दोघांनी 22 डिसेंबर 2020 रोजी लग्न केले. धनश्री सामन्यादरम्यान चहलला चिअर करण्यासाठी अनेकदा मैदानात पोहोचते. (yuzvendra chahal shares birthday wish for dhanashree verma)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी