30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमुंबईएसटी आंदोलकांना आझाद मैदान नंतर सीएसटीएम रेल्वे स्थानकावरुन देखील बाहेर काढलं!

एसटी आंदोलकांना आझाद मैदान नंतर सीएसटीएम रेल्वे स्थानकावरुन देखील बाहेर काढलं!

टीम लय भारी 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर शुक्रवारी दुपारच्या सुमारास शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Strike) धडक मोर्चा नेला. यावेळी शरद पवारांच्या निवासस्थानाच्या दिशेने चपला देखील भिरकावल्या गेल्या. हा सगळा हायव्होल्टेज ड्रामा तासभर चालल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत आधी आझाद मैदान आणि शनिवारी सकाळी सीएसटीएम रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी मारलेला ठिय्या इथपर्यंत हे नाट्य येऊन पोहोचलं आहे. (ST Strike On Azad Maidan)

सिल्व्हर ओकवरील आंदोलनानंतर (ST Strike) सर्व एसटी कर्मचारी पुन्हा आझाद मैदानावर पोहोचले होते. रात्रीपर्यंत आंदोलक तिथेच थांबल्यानंतर या आंदोलकांना मध्यरात्री उशीरा आझाद मैदानातून देखील हटवण्यात आलं. या कारवाईनंतर हे सर्व आंदोलक (ST Strike) जवळच्याच सीएसएमटी स्थानकात ठिय्या मांडून बसले आहेत. आपल्याला पोलिसांनी बळजबरीने आझाद मदानातून हुसकावल्याचा दावा या आंदोलकांनी केला आहे.

अजित पवार व दिलीप वळसे पाटीलांची प्रतिक्रिया :-

“चिथावणीखोर भाषा कुणी वापरली? कुणी त्यांच्या भावना भडकवल्या? नको त्या गोष्टी त्यांच्या डोक्यात घातल्या. हे लोक असा विचार करणारे नाहीत. पण कुणीतरी शक्ती त्यांच्या पाठिशी होती. ते शोधून (ST Strike) काढण्याचं काम पोलीस विभागाचं आहे. दिलीप वळसे पाटील यांचं म्हणणं आहे की त्यांनी देखील अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. लवकरच कुणी हे केलं याचा छडा लागेल”, असं अजित पवार म्हणाले.

शुक्रवारी दुपारनंतर राज्यभरात चर्चा होती ती एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Strike) शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी केलेल्या (ST Strike) आंदोलनाची. यावेळी आक्रमक झालेल्या काही आंदोलकांनी शरद पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्याचं दृश्यांमध्ये दिसत होतं. यानंतर रात्रीपर्यंत यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. मात्र, मध्यरात्री देखील हा हायव्होल्टेज ड्रामा सुरूच राहिला. आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना गावदेवी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी थेट पोलिसांवरच जीविताला धोका असल्याचा आरोप केला. यानंतर आझाद मैदानावरून पोलिसांनी आंदोलकांना (ST Strike) बाहेर काढल्यानंतर जमावानं थेट सीएसएमटी स्थानकामध्ये ठिय्या मांडला आहे.चे निर्देश दिल्यानंतर देखील एसटी कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.

हे सुद्धा वाचा :- 

Explained: Why MSRTC employees are on strike, and what led to protests outside Sharad Pawar’s house

एसटी कर्मचाऱ्यांचा काल आनंद तर आज सिल्व्हर ओकवर आक्रोश

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी