31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeक्राईमसेंट थॉमस चर्चमध्ये फादरांनी स्वत:लाच घेतले पेटवून

सेंट थॉमस चर्चमध्ये फादरांनी स्वत:लाच घेतले पेटवून

टीम लय भारी

ठाणे : नाताळ तथा ख्रिसमस सण अवघ्या पाच दिवसांवर आलेला असताना शालिमार परिसरातील सेंट थॉमस चर्चमध्ये फादर अनंत आपटे यांनी ताणतणावातून स्वत:ला बिशप शरद गायकवाड यांच्यासमोर पेट्रोल अंगावर ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि.१९) सकाळी ९.३० वाजेदरम्यान घडली. या घटनेत ते २५ टक्के भाजले असून, त्यांच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. फादरने स्वत:ला चर्चमध्ये जाळून घेण्याची पहिली घटना घडल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.( St. Thomas’ Church, the father set himself on fire)

सेंट थॉमस चर्चमध्ये रविवारी सकाळी ९ वाजता नेहमीप्रमाणी प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. प्रार्थनेसाठी सुमारे तीनशे ख्रिस्तीबांधव आले होते. तसेच, बिशप शरद गायकवाड हे अहमदनगरहून सेंट थॉमस चर्चमध्ये आले होते. त्यावेळी फादर आपटे यांनी बिशप शरद गायकवाड यांच्यासमोर स्वत:ला पेटवून घेतले. अचानक घडलेल्या घटनेने ख्रिस्ती बांधवांची पळापळ सुरु झाली. सुरुवातीला ख्रिस्ती बांधवांनी आपटे यांच्या कपड्यांना लागलेली आग विझवली. त्यानंतर त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. ही बाब भद्रकाली पोलिसांना समजताच ते रुग्णालयात आले. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्यात त्यांनी धक्कादायक आरोप बिशप व चर्च कमिटीवर केले आहेत.

शिक्षकाचा अश्लील कारनामा; विद्यार्थ्यांच्या WhatsApp ग्रुपवर पाठवला पॉर्न व्हिडिओ, सांगितलं विचित्र कारण

वसईतील डॉक्टरच्या घरी 14 लाखांचा दरोडा, वॉचमन गँगला 48 तासात ठोकल्या बेड्या

 असे आहेत फादर आपटेंचे आरोप
सेंट थॉमस चर्चच्या कमिटी व फादर अनंत आपटे यांच्या वाद सुरु आहेत. कमिटीचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपला असला तरी एक वर्षाहून कमिटी कामकाज करत आहे. याप्रकरणी फादर अनंत आपटे यांनी बिशप गायकवाड यांच्याकडे तक्रार केली आहे. तरीही, त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यांच्याशी फादर आपटे यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र,त्यांना बिशपांनी वेळ दिली नाही. ८ डिसेंबर रोजी बिशपांकडून नोकरीवरुन काढून टाकल्याचे पत्र दिले. त्यातून फादर आपटे ताणतणावाखाली होते.

फादरांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तक्रार
सेंट थॉमस चर्चमध्ये फादर अनंत आपटे यांनी गैरव्यवहार केल्याप्रकरणी चर्च कमिटीने नाशिक धर्मप्रांताचे बिशप शरद गायकवाड यांच्याकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी बिशपांनी चौकशी समिती नियुक्त केली. शिवाय, चौकशी पूर्ण होईपर्यंत फादर आपटे यांची ८ डिसेंबर २०२१ पासून पाळकीय सेवा स्थगित केली. मात्र, नोकरीवरुन काढून टाकल्याचा गैरसमज करुन घेत फादर आपटे यांनी स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. निर्दोष सिद्ध झाल्यावर त्यांना परत कामावर घेतले जाईल, असे बिशपांचे सेक्रेटरी वाघमारे यांनी सांगितले.
फादर आपटे यांनी स्वत:ला जाळून घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बिशप शरद गायकवाड यांच्या मनमानी कारभारामुळे ख्रिसमस सणाआधीच ही घटना घडली आहे. बिशप गायकवाडांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

इंटर्न महिला डॉक्टरवर गोळीबाराचा प्रयत्न, फेसबुक फ्रेंड पसार

Mumbai police raids illegal Hookah lounge, 80 arrested; Watch

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी