34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रसंपामुळे झालेले नुकसान कामगारांना वसूल करावे लागणार, असा महामंडळाचा कोणताच कट नाही

संपामुळे झालेले नुकसान कामगारांना वसूल करावे लागणार, असा महामंडळाचा कोणताच कट नाही

टीम लय भारी

मुंबई : एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. मात्र हे नुकसान कर्तव्य सांभाळून रूजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा महामंडळाचा कोणताच निर्णय नाही आहे, आणि अशी स्पष्टोक्ती ही एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.शेखर चन्ने यांनी आज दिली आहे(ST workers will not have to recover the losses caused by the strike).

एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. वारंवार आंदोलन करून देखील कामगारांचे प्रश्न व मागण्या पूर्ण होत नव्हत्या. आणि त्यामुळे गेल्या तीन महिन्यांहून अधिककाळ सुरु असलेल्या या संपामुळे एसटी महामंडळाला कोट्यावधी रूपयांचे नुकसान सोसावे लागले होते, आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी एसटी कामगारांच्या वेतनात कपात करून वसूल करण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या विचारधीन आहे, असे वृत्त आज प्रसिद्धी माध्यमांनी प्रसिद्ध केले होते(ST workers have called an indefinite strike to demand merger of ST Corporation with the state government).

वास्तविक, अशा प्रकरणी संपामुळे होणारी महसूली नुकसान भरपाई रुजू झालेल्या कामगारांच्या वेतनातून वसूल करण्याचा कोणताही निर्णय महामंडळाने घेतलेला नाही किंवा तसा प्रस्तावही विचारधीन नाही, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.शेखर चन्ने यांनी दिली आहे. तसेच अशा तथ्यहिन वृत्तांवर कामगारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, संपामुळे सर्वसामन्य प्रवासी, ज्येष्ठ नागरीकांचे तसेच शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कामगारांनी आपल्या कर्तव्यावर हजर व्हावे, असे आवाहनही श्री. चन्ने यांनी केले.

हे सुद्धा वाचा

विलीनीकरणाचा अहवाल मंजूर न झाल्यास पुन्हा आक्रमक आंदोलनाचा इशारा

पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वत: पुढं जाऊन संप मिटवा, पडळकरांचा परबांना सल्ला

ठाकरे सरकारने धनगरांच्या तोंडावर बोळा फिरवला आहे : गोपीचंद पडळकर

Defying management reprisals and state repression, Maharashtra public transport workers’ strike surpasses 100th day

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी