29 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात राष्ट्रीय किटकजन्यरोग नियंत्रण अंतर्गत जनजागृती, ठाणे जिल्हात हत्तीरोग दुरीकरण मोहिम

राज्यात राष्ट्रीय किटकजन्यरोग नियंत्रण अंतर्गत जनजागृती, ठाणे जिल्हात हत्तीरोग दुरीकरण मोहिम

टीम लय भारी

ठाणे : हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेंतर्गत (state health department) भिवंडी तालुक्यात उद्यापासून दि. २५ मे ते ५ जुन या कालावधीत सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांनी सांगितले.(state health department)

राज्यात राष्ट्रीय किटकजन्यरोग नियंत्रण अंतर्गत जनजागृती, ठाणे जिल्हात हत्तीरोग दुरीकरण मोहिम

राष्ट्रीय किटकजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम (state health department) २०२२ अंतर्गत जिल्हा समन्वय समितीची सभा उपजिल्हाधिकारी श्री. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. महेश नगरे, विभागीय अधिकारी भिवंडी निजामपूर महानगरपालिका डॉ. प्रिया फडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. सईद, ठाणे जिल्ह्याच्या हत्तीरोग अधिकारी दिपाली नासरे आदी उपस्थित होते.

राज्यात राष्ट्रीय किटकजन्यरोग नियंत्रण अंतर्गत जनजागृती, ठाणे जिल्हात हत्तीरोग दुरीकरण मोहिम

औषधोपचार मोहिमेबाबत माहिती देताना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. नगरे यांनी सांगितले, ऑक्टोबर २०२१ मध्ये सहा ते सात वर्ष वयोगटातील निवडक मुलांची तपासणी करण्यात आली. त्यात ठाणे जिल्ह्यातील ४३ लहान मुलांच्या रक्तात हत्तीरोगाचे सुक्ष्मजीव आढळले असून त्यात भिवंडी तालुक्यातील (state health department) सर्वाधिक २३ बालके आहेत. त्याअनुषंगाने ठाणे येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्रात दि. २० मे रोजी भिवंडी तालुक्यातील वैद्यकिय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.

Ani anna Gote advt

बालकांना हत्तीरोग मुक्त ठेवण्यासाठी मुले, प्रौढ व्यक्ती व वयोवृद्ध या सर्वांनी हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळयांचे सेवन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भिवंडी मध्ये प्रादुर्भाव अधिक असल्याने या तालुक्यात पुढील दोन वर्ष सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार (state health department) असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात राष्ट्रीय किटकजन्यरोग नियंत्रण अंतर्गत जनजागृती, ठाणे जिल्हात हत्तीरोग दुरीकरण मोहिम

 

हत्तीरोगाची कारणे

हत्तीरोग हा क्युलेक्स प्रजातीच्या डासांमार्फत (state health department) होतो. सेप्टिक टँक, घाण/ निचऱ्याच्या जागी व गटारे अशा दुषित पाण्याच्या जागी या डासांची पैदास होते.

राज्यात राष्ट्रीय किटकजन्यरोग नियंत्रण अंतर्गत जनजागृती, ठाणे जिल्हात हत्तीरोग दुरीकरण मोहिम

हत्तीरोगाची लक्षणे

हाता/पायाला सुज किंवा हत्तीपाय सारख्या विकृती, डास चावल्यानंतर/सुक्ष्मजीव शरीरात प्रवेश झाल्यानंतर पाच ते दहा वर्षांनतर निर्माण होत असल्याने सुरुवातीच्या (state health department) काळात व्यक्ती/रुग्ण याबाबत अनभिज्ञ राहतात.

हे सुद्धा वाचा :- 

New York State Department of Health Announces First COVID-19 Boosters for 5- to 11-Year-Olds

‘भारतात परचक्र आले असताना देखील आपल्या देशातील कला टिकून राहिल्यात’

मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये ‘फोटोवॉर’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी