33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयधनुष्य-बाण, शिवसेनेसाठी २००० कोटींचा सौदा ; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

धनुष्य-बाण, शिवसेनेसाठी २००० कोटींचा सौदा ; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्य बाण’ हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर आणि निवडणूक आयोगावर तोंडसुख घेतले. निवडणूक आयोगाच्या हेतूंबद्दलही शंका घेण्यात आली. निवडणूक अयोग हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुलाम असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्य-बाण’ या चिन्हासाठी तब्बल २,००० कोटी रुपयांचा सौदा करण्यात आल्याचा नवीन आरोप केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगणार आहे. (2000 crore deal for Shiv Sena and Dhanushya-Bana; Sensational accusation of Sanjay Raut) ते म्हणाले, “शिवसेना आणि धनुष्य बाण चिन्ह विकत घेण्यासाठी आतापर्यंत २००० कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे.”

संजय राऊत यांनी रविवारी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्य बाण’ चिन्ह मिळविण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून २००० कोटींची देवाण-घेवाण करण्यात आली आहे, अशी माझ्याकडे प्राथमिक माहिती आहे. आयोगाच्या निर्णयावर टीका करताना राऊत म्हणाले, आयोगाचा हा निर्णय गुणवत्तेच्या निकषाला धरून नव्हता, तर हा एक शुद्ध व्यावसायिक सौदा होता. या धंद्यात मोठी रक्कम संबंधितांना अदा करण्यात आली आहे. मात्र, शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी राऊत यांचा आरोप फेटाळून लावला आहे. सरवणकर यांनी संजय राऊत यांच्या या आरोपाची खिल्ली उडवताना म्हंटले आहे की, संजय राऊत हे खजिनदार आहेत का?”(“Is Sanjay Raut a cashier?”)

आमदारांच्या घोडेबाजाराबाबत राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “आमदारांचा पाठिंबा खरेदी करण्यासाठी ५० लाख रुपये दिले जातात, खासदारांसाठी एक कोटी आणि शाखांसाठी पाच कोटींचा व्यवहार केला जातो, तर मग ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्य बाण’ चिन्ह मिळविण्यासाठी त्यांनी निश्चितच प्रचंड रक्कम खर्च केली असणार. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नाव आणि चिन्ह त्यांनी चोरले आहे. या सर्व प्रकरणात पैशाने मोठी भूमिका निभावली आहे, अशी माझी पूर्ण खात्री आहे.”

हे सुद्धा वाचा

शिवभक्तांना शिवनेरीवर येण्यापासून मज्जाव का करता? संभाजी राजेंनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले

२०२३ च्या मध्यावर मोदींचा राजीनामा ; न्यायमुर्ती, राजकारणी, उदयगपतींवर ‘पेगासस’ची हेरगिरी

चोरीचे धनुष्य बाण घेऊन निवडणुकीला सामोरे या..! उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी