मागील चार महिन्यांत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावरील जेवणाचे बिल २ कोटी ३८ लाख रुपये आले. सरकार चहामध्ये सोन्याचा अर्क टाकते का? असा जाब राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारच्या उधळपट्टीवर विचारला होता. त्याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले असून करून काळात ‘फेसबुक लाईव्ह’ सुरु असताना वर्ष बंगल्याचा महिन्याचा खर्च ३५ लाख झाला, याची माहितीही अजित पवारांनी घ्यावी, असा टोला लगावला आहे. अजित पवारांनी सरकारच्या वारेमाप उधळपट्टीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता एकनाथ शिंदेंनीही उद्धव ठाकरेंच्या काळातला हिशेब मांडला आहे. त्यामुळे हिशेबाच्या मुद्द्यावरून अर्थातच उधळपट्टीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक शिमगा सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. (35 lakh was spent while Facebook Live was going on, did you know about it?)
एकनाथ शिंदे यांनी करून काळात उद्धव ठाकरेंचे ‘फेसबुक लाईव्ह’ सुरु असताना वर्ष बंगल्याचा महिन्याचा खर्च ३५ लाख झाला, याची माहिती घेण्याचा सल्ला अजित पवारांना दिला आहे. ते म्हणाले,” वर्षा गेले अडीच वर्ष बंद होतं. सहा सात महिन्यांपासून लोक वर्षावर येत आहेत. वर्षावर आल्यानंतर लोकांना चहा-पाणी द्यायचं नाही का? आम्ही त्यांना बिर्याणी खाऊ घालत नाही. पण चहापाणी देऊ शकत नाही का?” असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे. अजित पवारांनी चहाचा हिशेब काढला ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. या मुद्द्यावरून त्यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले, “आज अजित पवार यांनी आमच्या चहापाण्याचा हिशेब काढला. मग आम्हालाही सांगा तुम्ही ७० हजार कोटी सिंचनासाठी पाण्यात घालवले. तरीदेखील शून्य पॉईंट जमीन सिंचनाखाली आली नाही. हे मी नाही, तर पृथ्वीराज चव्हाण आणि कॅगनेच म्हटले आहे. त्याचाही हिशेब द्यावा लागेल. कुठे घसरता याचा विचार करा?”
काय म्हणाले होते अजित पवार
मागील चार महिन्यांत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावरील जेवणाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये आले आहे. सरकार चहामध्ये सोन्याचा अर्क टाकते का? असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्ताधारी पक्षावर केली आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी असलेल्या निधीचे वाटप झालेले नसताना सरकारकडून जाहिरातबाजीवर उधळपट्टी करण्यात येत आहे. आर्थिक वर्ष आता संपत आले असून हा निधी परत जाण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा
अधिवेशनात उपस्थित राहा, एकनाथ शिंदेंनी उद्धव गटातील आमदारांना बजावला व्हिप
सुभाषसिंग ठाकूर कोणाचा माणूस आहे याचे उत्तर द्या, महाराष्ट्रद्रोह्यांचे राष्ट्रद्रोह्यांना आव्हान
वरळीतून नाही, तर कोपरी-पाचपाखाडीतून निवडणूक लढवतो ; आदित्य ठाकरेंचे शिंदेंना आव्हान