28 C
Mumbai
Friday, August 5, 2022
घरराजकीयEXCLUSIVE : शिवसेनेचे ३५ आमदार भाजपच्या संपर्कात

EXCLUSIVE : शिवसेनेचे ३५ आमदार भाजपच्या संपर्कात

टीम लय भारी

मुंबई : बेसावध राहिलेले ‘महाविकास आघाडी’ सरकार आता कोसळण्याच्या मार्गावर आहे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडली असून १३ आमदारांसह एकनाथ शिंदे गायब झाले आहेत. या आमदारांसह एकनाथ शिंदे सुरतमध्ये आहेत. १२ वाजता पत्रकार परिेषद घेवून शिंदे आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

सध्या शिवसेनेचे साधारण १९ आमदार नॉट रिचेबल आहेत. पण वास्तवात मात्र शिवसेनेचे ३५ आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी ‘लय भारी’शी बोलताना दिली. ‘महाविकास आघाडी’ सरकार सत्तेत आल्यापासूनच हे ३५ आमदार नाराज होते. ते आमच्या नेत्यांच्या मागे लागले होते. काहीही करा पण ‘आपले’ सरकार आणा, असा तगादा त्यांनी लावला होता, असे हाके यांनी सांगितले.

कोणत्याही आमदारांना मुख्यमंत्री भेटत नाहीत. आमदारांची कामे होत नाहीत. सगळे मंत्री भ्रष्ट, घोटाळेबाज आहेत. स्वतःच्याच तुंबड्या भरत होते. आमदारांना मात्र कुणी विश्वासात घेत नव्हते. त्याचा परिपाक म्हणजे आमदारांमधील नाराजी वाढत चालली होती, असे हाके म्हणाले. शिवसेनेतून बंड होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ‘महाविकास आघाडी’ सरकार अल्पमतात येवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागेल. परिणामी लवकरच राज्यात सत्ता करेल, असे हाके म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यमंत्री शंभूराज देसाई, प्रकाश आबिटकर, प्रताप सरनाईक, महेश शिंदे, तानाजी सावंत, संजय राठोड, महेंद्र दळवी, भरत गोगावले इत्यादी आमदार सुरतमध्ये आहेत. तेथील ‘ला मेरीडीयन’ हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदार व खासदारांना मुंबईत तातडीने बोलाविले आहे. शरद पवार हे सध्या नवी दिल्लीत आहेत. त्यांनी छगन भुजबळांना तातडीने बोलावून घेतले आहे. अजित पवार, जयंत पाटील यांनाही बोलावून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नवी दिल्लीला तातडीने रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा :

बाळासाहेब थोरातांनी सांगितली भाजपची एक पद्धत…

भांडण महाविकास आघाडी आणि भाजपचे; पण नासाडी टरबुजांची

रवी राणांचे तुणतुणे सुरूच, ‘हाती कथलाचा वाळा, अन् मला सोनूबाई म्हणा’

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!