34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयनिम्मे मतदार ठरवणार पुण्यातील 2 नवे आमदार; कसब्यात धंगेकर यांचाच डंका; चिंचवड...

निम्मे मतदार ठरवणार पुण्यातील 2 नवे आमदार; कसब्यात धंगेकर यांचाच डंका; चिंचवड जगतापांचेच राहणार; पत्रकारांना पाकिटे!

भाजप कार्यकर्त्यांनी पेठातून पुण्यात स्थलांतरित झालेल्या हक्काच्या मतदारांना मतदान केंद्रांवर आणून मतदानाचा टक्का वाढवून घेतला. मात्र, या मतदारसंघात काँग्रेस नेते व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रवींद्र धंगेकर यांचाच डंका शेवटपर्यंत कायम राहिला. त्यांचेच पारडे जड असल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून मतमोजणीत काही गडबड न झाल्यास धंगेकर यांचा विजय नक्की असल्याचे कार्यकर्ते छातीठोकपणे सांगत आहेत.

भाजप आणि शिंदे सेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या पुण्यातील कसबा व चिंचवडमधील पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का काहीसा घसरलेला आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, कसबा पेठ व चिंचवडमध्ये 50 टक्के मतदान झाले. (50 Percent Voting in Kasba Peth Chinchwad) मतदानाच्या आकडेवारीवरून, निम्मे मतदार ठरवणार पुण्यातील 2 नवे आमदार असेच म्हणावे लागेल. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचाच डंका शेवटपर्यंत कायम राहिला. तर चिंचवड जगतापांचेच राहणार, अशी शक्यता आहे. दरम्यान,  पुण्यातील पत्रकारांना कर्नाटकच्या धर्तीवर बक्षिसी म्हणून लाखाची भगवी पाकिटे दिली गेल्याची चर्चा जोरात आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी 50.47 टक्के इतकी आहे. निवडणूक आयोगाच्या  अंतिम आकडेवारीनुसार, एकूण मतदान 2,87,145 इतके झाले. चिंचवड विधानसभा मतदार संघात नोंद झालेल्या मतदारांची एकूण संख्या 5,68,954 इतकी आहे. 510 मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडल्याचे आयोगाने म्हटले आहे.

निम्मे मतदार ठरवणार पुण्यातील 2 नवे आमदार; कसब्यात धंगेकर यांचाच डंका; चिंचवड जगतापांचेच राहणार
चिंचवड विधानसभा मतदारसंघ अंतिम मतदान टक्केवारी

कसबा पेठ मतदारसंघात अंदाजे 50.06% इतके मतदान झाल्याची माहिती आहे. निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी रात्री उशीर जाहीर झाली. इथे एकूण 2,75,678 मतदारांपैकी 1,38,018 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजप कार्यकर्त्यांनी पेठातून पुण्यात स्थलांतरित झालेल्या हक्काच्या मतदारांना मतदान केंद्रांवर आणून मतदानाचा टक्का वाढवून घेतला. मात्र, या मतदारसंघात काँग्रेस नेते व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रवींद्र धंगेकर यांचाच डंका शेवटपर्यंत कायम राहिला. त्यांचेच पारडे जड असल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून मतमोजणीत काही गडबड न झाल्यास धंगेकर यांचा विजय नक्की असल्याचे कार्यकर्ते छातीठोकपणे सांगत आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ अंतिम मतदान टक्केवारी
चिंचवडमधील विभागनिहाय मतदान

चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप यांच्या तर कसब्यात भाजपच्या मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणूक घेण्यात आली. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप या दहा हजारांहून अधिक मतांच्या फरकाने सहज विजयी होतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. दुसरीकडे, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ मतदारसंघात महाविकास आघाडीने एकदिलाने प्रचारात सारी शक्ती पणाला लावली. त्यामुळे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच घाम गाळावा लागला. त्यांच्यासह अनेक भाजप नेत्यांना पुण्यात तळ ठोकणे भाग पाडले. त्यातच काही भाजप कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटप करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने भाजपच्या इभ्रतीला व स्वच्छ प्रतिमेच्या दाव्यालाही तडा गेला. इथे धंगेकर यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे.

हे सुद्धा वाचा : 

ब्राम्हणेतर व्यक्तीला उमेदवारी दिली, आता भोगा परिणाम ! हिंदू महासंघाच्या आनंद दवेंचा भाजपला थेट इशारा

मविआने उमेदवार मागे घेतल्यास टिळक कुंटुंबातील व्यक्तीला भाजपची उमेदवारी!

लक्ष्मण जगताप यांच्या आजारपणातच भाजपने रचले होते आमदारकीच्या निवडणुकीचे कारस्थान, राष्ट्रवादी नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ!

या निवडणुकीत महाशक्ती-धनशक्तीकडून पुण्यातील पत्रकारांना मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप झाल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. निवडणुकीचे तसेच राजकीय वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना कर्नाटकच्या धर्तीवर भगव्या पाकिटातून लाखोंची बक्षिसी दिली गेल्याची चर्चा आहे. मतदान प्रक्रियेवर प्रभाव पडेल अशा पद्धतीने सत्य व वस्तुस्थिती न मांडता गुळमुळीत तसेच नरो वा कुंजरो वा पद्धतीने बातम्या देण्यासाठी पत्रकारांना पाकिटे दिली गेली. त्यामुळेच जनमताचा कौल अगदी स्पष्ट दिसत असताना, जनभावना नेमकेपणाने न मांडता पुण्यातील बहुतांश पत्रकार हे महाशक्ती-धनशक्तीच्या दावणीला बांधले गेले होते. निवडणूक काळात त्यांची सर्व पद्धतीने, खास सोय करून बडदास्त ठेवली गेल्याचे किस्से आता रंगवून चघळले जात आहेत. अनेक पत्रकारांनी टीव्ही डिबेट, टॉक शो, विश्लेषण यात नेमकी स्थिती न मांडता अगदी वरवर शाब्दिक फुलोरे फक्त फुलविले. थेट निवडणूक मैदानातून, निवडणूक कव्हर करणाऱ्या पत्रकारांच्या तोंडून वैगेरे ढोल बडविले गेले. मात्र, बहुतांश पत्रकारांनी महाशक्ती-धनशक्ती नाराज होऊन आपल्या वाट्याच्या भगव्या पाकिटातील बक्षिसीचे वजन कमी होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेतली. नानासाहेब परुळेकर यांच्यासारख्या जनसामान्यांसाठी पत्रकारिता करणाऱ्या टिळक-आगरकर यांच्या भूमीतले पत्रकारितेचे हे स्वरूप व्यथित करणारेच म्हणावे लागेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी