33 C
Mumbai
Monday, May 15, 2023
घरराजकीयभाजपचा हेमंत रासने, राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे, रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

भाजपचा हेमंत रासने, राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे, रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील ठोंबरे आणि महाविकास आघाडीचे कसबा पोटनिवडणुकीतील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र धंगेकरांनी उपोषण करत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर रुपाली ठोंबरे यांच्यावर गोपनियतेचा भंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. रुपाली ठोंबरे यांनी रविवारी एक मतदार मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या चिन्हासमोरचे बटन दाबतानाचे छायाचित्र फेसबुकवर अपलोड केले होते. त्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी केली होती. मात्र, या धमकीला आपण भीक घालत नसल्याचे सांगत रुपाली ठोंबरे यांनी त्यांना आव्हान दिले होते. मी शेंगा खाल्ल्या नाहीत. मी टरफले उचलणार नाही. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायचा असेल तर खुशाल करा, असे आव्हानच त्यांनी सत्ताधाऱ्यांना केले होते. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासनेंवरही भाजपाचं निवडणूक चिन्ह कमळाचं उपरणं घालून मतदान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case has been filed against NCP’s Rupali Patil Thombre and Ravindra Dhangekar)

A case has been filed against NCP's Rupali Patil Thombre and Ravindra Dhangekar

रविवारी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी भाजपचे चिन्ह असलेलं उपरणं गळ्यात घालून मतदान केले होते. त्यांच्या या कृत्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांनी निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार केली होती. मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या परिसरात मतदारांवर प्रभाव पडेल अशी कृती करण्यास राजकीय पक्षांना मनाई आहे. या नियमाचे हेमंत रासने यांनी उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फायरब्रॅन्ड नेत्या अशी ओळख असलेल्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. रविवारी सकाळी ७.०० वाजण्याच्या दरम्यान त्यांनी फेसबुकवर ही पोस्ट अपलोड केली होती. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. रूपाली ठोंबरे पाटील यांनी आचारसंहितेचा भंग काल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र, विरोधकांना रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर देताना म्हंटले होते की, हे छायाचित्र मी पोस्ट केले आहे कारण माझा तो हक्क आहे. माझ्यावर त्यासाठी कुणीही कारवाई करू शकत नाही. जर कारवाई करायचीच असेल तर भारतीय जनता पक्षाच्या गुंडांवर करा असा पलटवार रूपाली ठोंबरे पाटील यांनी केला होता.

 

हे सुद्धा वाचा

फेसबुक लाईव्ह सुरु असताना ३५ लाख खर्च झाले, त्याची माहिती घेतली का; शिंदेंचा अजित पवारांना टोला

अधिवेशनात उपस्थित राहा, एकनाथ शिंदेंनी उद्धव गटातील आमदारांना बजावला व्हिप

फेसबुक लाईव्ह सुरु असताना ३५ लाख खर्च झाले, त्याची माहिती घेतली का; शिंदेंचा अजित पवारांना टोला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी