28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयत्यात काय एवढे, सामान्यांच्या घरीही ४-५ कोटी सापडतात, भाजप आमदार विरुपक्षप्पांचे निर्लज्ज...

त्यात काय एवढे, सामान्यांच्या घरीही ४-५ कोटी सापडतात, भाजप आमदार विरुपक्षप्पांचे निर्लज्ज विधान

मागील आठवड्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार मडल विरुपक्षप्पा यांचा मुलगा व्ही प्रशांत मडल याला विरुपक्षप्पा यांच्या कार्यालयात ४० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर विरुपक्षप्पा यांच्या घरीदेखील धाड टाकण्यात आली. त्यावेळी कोट्यवधींचे घबाड सापडल्यानंतर विरुपक्षप्पा अचानक अज्ञातवासात गेले. अखेर अखेर मंगळवारी न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर ते पुन्हा प्रकट झाले. मात्र, अंतरिम जमीन मिळाल्यानंतर विरुपक्षप्पा यांनी या घटनेचे समर्थन केले असून त्यात एवढा बाऊ कशासाठी करायचा, हल्ली सर्वसामान्यांच्या घरीसुद्धा ४-५ कोटी रुपये सापडतात, असे निर्लज्ज विधान केले आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेत्यांचे शुद्धीकरण होत असल्याची टीका विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात नुकतीच केली आहे. विरुपक्षप्पा यांच्या या विधानंतर भाजपची कोंडी झाली आहे. (A shameless statement of BJP MLA Virupakshappa)

मडल विरुपक्षप्पा यांनी केलेल्या विधानामुळे सर्वसामान्यांमध्ये रोष उत्पन्न झाला आहे. लोकायुक्त पोलिसांनी कर्नाटकमधील सत्ताधारी भाजपचे आमदार विरुपक्षप्पा यांच्या कार्यालयात त्यांचे पुत्र व्ही प्रशांत मडल यांना एका व्यावसायिकाकडून ४० लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. ८१ लाखांचा सौदा झाला असताना पहिला हप्ता म्हणून ४० लाखांची लाच दिली जात होती. संबंधित व्यावसायिकाच्या तक्रारीवरूनच हा छापा टाकण्यात आला होता. यानंतर विरुपक्षप्पा यांच्या घरी टाकलेल्या छाप्यातही जवळपास ६ ते ८ कोटींची रोख रक्कम सापडली होती. यावर प्रतिक्रीय देताना विरुपक्षप्पा म्हणाले की, माझ्या घरात सापडलेली रक्कम लाचेच्या माध्यमातून जमा करण्यात आली नाही. आमच्या कौटुंबिक व्यवसाय आणि शेतीतून आलेला तो पैसा आहे. आमचा सुपारी उत्पादनाचा व्यवसाय आहे. माझ्याकडे सुपारीचं १२५ एकर शेत आहे.

विरुपक्षप्पा यांचे निर्लज्ज समर्थन
मडल विरुपक्षप्पा यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली असून या घटनेचे निर्लज्ज समर्थन केले आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपची अडचण झाली आहे. ते म्हणाले, “चन्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुपारीचा व्यवसाय होतो. त्यामुळे सामान्य व्यक्तीच्या घरीही ४-५ कोटी सापडू शकतात. आमचे अनेक व्यवसाय आहेत. त्यामुळे ६ कोटी ही रक्कम आमच्यासाठी काही फार मोठी गोष्ट नाही. मी यासंदर्भात लोकायुक्तांना योग्य ती कागदपत्र सादर करेन.”

हे सुद्धा वाचा

चाळीस डोके आणि पन्नास खोके ; सरकारचा संबंध डोक्याशी कमी खोक्याशी जास्त

१८० वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ इमारतीच्या म्युझिअमसाठी ५ कोटी रुपये ! ; जे. जे. चा इतिहास जनतेसमोर सादर करणार

विरोधकांची दडपशाही करण्याचा ‘गुजरात पॅटर्न’ महाराष्ट्रातही; नाना पटोले यांची भाजपवर टीका

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी